पॅसेंजर गाड्या, इंटरसिटी मार्चपासून सुरू होण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:28 IST2021-02-05T05:28:18+5:302021-02-05T05:28:18+5:30
अमरावती : दहा महिन्यांपासून बंद असलेल्या पॅसेंजर, इंटरसिटी रेल्वे गाड्या मार्चपासून सुरू होण्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले आहे. रेल्वे ...

पॅसेंजर गाड्या, इंटरसिटी मार्चपासून सुरू होण्याचे संकेत
अमरावती : दहा महिन्यांपासून बंद असलेल्या पॅसेंजर, इंटरसिटी रेल्वे गाड्या मार्चपासून सुरू होण्याचे संकेत रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले आहे. रेल्वे बोर्डाकडे लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनंतर आता सकारात्मक पाऊल उचचले जात आहे. पॅंसेजर गाड्यांबाबत वरिष्ठांनी आढावा घेतल्याची माहिती आहे.
गावखेड्यांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अतिशय सोयीची ठरणाऱ्या पॅसेजर, इंटरसिटी रेल्वे बंद आहेत. मात्र, विशेष रेल्वे गाड्यांचा प्रवास आर्थिकदृष्ट्या न परवडणारा आहे. विदर्भातून शेगाव येथे संत गजानन महाराज यांचा दर्शनासाठी जाणारा बराच मोठा भक्तगण आहेत. परंतु, पॅंसेजर गाड्या बंद असल्याने बस अथवा विशेष रेल्वे गाड्यांनी सामान्य भक्तांना शेगावीची महागडी वारी शक्य नाही. मात्र, मार्चपासून अमरावती-भुसावळ, नागपूर-भुसावळ, वर्धा-भुसावळ, अमरावती-नागपूर इंटरसिटी, अमरावती- जबलपूर एक्स्प्रेस आदी सामान्य गाड्या सुरू झाल्यास प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. पॅंसेजर गाड्या बंदमुळे रेल्वे प्रशासनाच्या उत्पन्नात घट झाली आहे.
------------
रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पॅंसेजर, इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्यासाठी ५ जानेवारी रोजी पत्र दिले आहे. सर्वसामान्यांची मागणी लक्षात घेता, पॅंसेजर गाड्या लवकर सुरू होतील, असे संकेत आहेत. मुंबईत लोकल सुरू झाली. आता पॅंसेजर गाड्या सुरू होण्यास काहीही हरकत नाही.
- नवीत राणा, खासदार, अमरावती.