-तर पक्ष गुंडाळेल
By Admin | Updated: September 30, 2014 23:28 IST2014-09-30T23:28:26+5:302014-09-30T23:28:26+5:30
नेत्यांनी जनतेच्या तोंडावर नुसती पाने पुसली आहेत. मी या राजकारण्यांसारखा नाही. राज्याचे मला भले करता आले नाही तर मी पक्ष बंद करुन टाकेल, असे म्हणत राज्यात सत्ता स्थापनेची एकदा

-तर पक्ष गुंडाळेल
राज ठाकरे यांचे प्रतिपादन : दर्यापूर, वलगाव, चांदूररेल्वेत सभा
दर्यापूर/चांदूररेल्वे: नेत्यांनी जनतेच्या तोंडावर नुसती पाने पुसली आहेत. मी या राजकारण्यांसारखा नाही. राज्याचे मला भले करता आले नाही तर मी पक्ष बंद करुन टाकेल, असे म्हणत राज्यात सत्ता स्थापनेची एकदा संधी देण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
मनसेच्या विदर्भातील पहिल्या प्रचार सभेची सुरुवात आज मंगळवारी दर्यापूर येथून करण्यात आली. दर्यापूर येथील सभेत त्यांनी आपल्या भाषणातून सर्वच नेत्यांना फटकारले. सकाळी १०.३० ची सभा दोन तास उशिरा म्हणजे १२.३० वाजता सुरु झाली. त्यानंतर वलगाव व रात्री चांदूररेल्वे येथे जाहीर सभा झाली.
सभेत पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वीच या सरकारने पोलीस भर्ती घेतली. तरुणांना पाच-पाच कि.मी. धावायला लावले. यात चार तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोलीस भर्तीसाठी आलेल्या मुलांवर पोलिसानांच लाठीचार्ज करावा लागत आहे. माझ्या विकास आराखड्यात तरुणांच्या नोकरी संदर्भातील व्हिजन आहे. सिक्युरिटी एजन्सीजमार्फत परप्रांतीयांना भर्ती करुन घेतले जाते. मराठी मुलांना काम मिळत नाही. मंत्र्यांंवर तोफ डागताना राज ठाकरे म्हणाले विदर्भासारख्या सुपीक भागाचे काय केले यांनी, फक्त नागर फिरवला आहे. पाणी देवू, रास्ते देवू, नोकऱ्या देवू आता ते कोठे गेले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विदर्भात सर्वात जास्त संत्रा उत्पादित होतो. जगात संत्र्यांचा रस ७० टक्के लोक पितात व हे व्यापारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल करुन शेतकऱ्यांची दिशाभूल करतात. परंतु यांना संत्र्यांवर प्रक्रिया करण्याची एक ही कंपनी विदर्भात आणता आली नाही. कापूस इकडे सुतगिरणा कोल्हापुरात, जे जिथं पिकतं तेथे उद्योग आणाचे नाही? परंतु मी असे करणार नाही, जिथे उद्योग तेथे कारखाना आणणार, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून दिले.
व्यासपीठावर शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, अनिल शिदोरे सहसंपर्क अध्यक्ष रावसाहेब कदम, बबन धामोतकर, जिल्हा संघटक पप्पू पाटील, राजेंद्र गायगोले, प्रवीण तायडे, दर्यापूर तालुकाध्यक्ष जयंत वाकोडे, अंजनगावचे सुधाकर फुलंबरकर, शकुंतला शिंदे, भूषण फरतोडे, दर्यापूरचे गोपाल चंदन, अकोटचे प्रदीप गावंडे, मूर्तिजापूरचे रामा उंबरकर, अकोल्याचे पंकज साबळे, अचलपूरचे प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते.