महायज्ञात १०१ जोडप्यांचा सहभाग
By Admin | Updated: March 12, 2016 00:20 IST2016-03-12T00:20:30+5:302016-03-12T00:20:30+5:30
महावीरनगर स्थित हनुमान मंदिरात शिवलिंग व दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. १०१ जोडप्यांनी महायज्ञात सहभाग घेतला.

महायज्ञात १०१ जोडप्यांचा सहभाग
अमरावती : महावीरनगर स्थित हनुमान मंदिरात शिवलिंग व दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. १०१ जोडप्यांनी महायज्ञात सहभाग घेतला. यावेळी आ. रवी राणा व नवनीत राणा प्रामुख्याने उपस्थित होते. महावीर नगर परिसरातील हनुमान मंदिरात १२ शिवलिंंग व दत्तात्रेयांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी महायज्ञ करण्यात आले.
या महायज्ञाच्या कार्यक्रमात १०१ जोडप्यांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण कार्यक्रमाला राणा दाम्पत्य प्रामुख्याने उपस्थित होते. मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम व शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमांना भाविक भक्तांची मोठी गर्दी होती. या आयोजनात अजय बोबडे, राजू किटुकले, घोरड, प्रशांत तिडके, रितेश व्यास, सतीश ठाकरे, प्रवीण बेलसरे, अरविंद खाडे, विजय बोबडे, मनीष बोदडे आदी सहभागी झाले होते.