पीक विम्यात १,७२,६५५ शेतकऱ्यांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:29+5:302021-07-27T04:13:29+5:30
अमरावती : कृषिमंत्र्यांच्या आदेशाने कंपनीवर एफआयआर दाखल करण्यात आल्याने चर्चेत आलेल्या पीक विमा योजनेच्या २५ जुलै या अंतिम मुदतीपर्यंत ...

पीक विम्यात १,७२,६५५ शेतकऱ्यांचा सहभाग
अमरावती : कृषिमंत्र्यांच्या आदेशाने कंपनीवर एफआयआर दाखल करण्यात आल्याने चर्चेत आलेल्या पीक विमा योजनेच्या २५ जुलै या अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील १,७२,६५५ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविलेला आहे. यामध्ये १३.१६ कोटींचा प्रीमियम शेतकऱ्यांनी भरणा केलेला आहे. याशिवाय केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ४५.२६ कोटींचा प्रीमियम राहणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
यावर्षी प्रथमच कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आलेली आहे. हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी किंवा लावणी न झाल्यास होणाऱ्या नुकसानाकरिता विमा संरक्षण देय आहे. याशिवाय हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पीक काढणीच्या १५ दिवस आधी पूर, पावसातील खंडामुळे पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांची तूट येत असल्यास अधिसूचित क्षेत्रात विमा संरक्षण देय राहणार आहे.
पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात घट येणार असल्यास विमा संरक्षण देय राहणार आहे. पीक कापणी प्रयोगावरून उपलब्ध झालेल्या सरासरी उत्पन्नाची तुलना उंबरठा उत्पन्नाशी करून भरपाई निश्चित केले जाते. याशिवाय नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्चात नुकसान व पिकांच्या काढणीच्या काळात दोन आठवड्यांच्या आत गारपीट, चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई निश्चत केली जाते. मात्र, याविषयी शेतकऱ्यांनी ७२ तासांपूर्वी विमा कंपनी किंवा लगतच्या कृषी कार्यालयास कळविणे बंधनकारक आहे.
बॉक्स
पीक विम्याची तालुकानिहाय स्थिती
तालुका शेतकरी प्रीमियम क्षेत्र संरक्षित
अचलपूर ६,२४८ ४९,३६,२१९ ६,४०८
अमरावती ९,७९५ ८३,४७,३८८ १०,९०८
अंजनगाव १७,८६५ १,२५,४०,४१२ १८,६४५
भातकुली १६,७२९ १,३२,५१,२०२ १८,४५१
चांदूर रेल्वे ७,५०२ ५९,७७,५५७ ७,९८८
चांदूर बाजार ९,७०५ ७९,९९,९०३ ९,६४९
चिखलदरा ८१७ ६,३४,३९५ ८६४
दर्यापूर ४३,२३८ २,७१,५८,६८८ ५०,९१०
धामणगाव २,६३५ ३०,२४,०८२ ३,१३७
धारणी २,५०२ २५,३२,९८५ ३,११८
मोर्शी ११,७०६ १,११,७९,०२१ १२,४७०
नांदगाव ३४,८३५ २,५२,६७,०१७ ३४,४७४
तिवसा ७,१६७ ६६,६६,५६२ ७,५१०
वरूड १,९११ २१,१६,००३ १,६६०
एकूण १,७२,६५५ १३,१६,२४,४३४ १,८६,१९२