शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

उद्यानेही असुरक्षित; अल्पवयीन मुलीला ‘तो’ दाखवायचा ‘पॉर्न’, आंबटशाैकीनाला महिलांनी दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 12:37 IST

उपराईच्या विकृताविरुद्ध गाडगेनगरमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल

अमरावती : उद्यानात खेळायला आलेल्या अल्पवयीन मुलींना जवळ बसवून त्यांना पॉर्न व्हिडीओ दाखवून त्यांच्याशी अश्लील कृत्य करणाऱ्या विकृतास बेदम चोप देण्यात आला. दोन महिलांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ३१ मे रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका उद्यानात तो अश्लाघ्य प्रकार घडला.

याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी आरोपी मनोज मोहन मेश्राम (४५, रा. उपराई, ता. दर्यापूर) याच्याविरुद्ध विनयभंग व पोक्साेअन्वये गुन्हा दाखल केला. त्याला तातडीने अटक केल्याची माहिती गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी ‘लोकमत’ला दिली. या घटनेवरून उद्यानेही मुलींसाठी असुरक्षित बनल्याचे वास्तव उघड झाले आहे. गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेच्या घरी तिच्या बहिणीच्या दोन अल्पवयीन मुली पाहुणपणाने आल्या होत्या. दरम्यान, त्यांनी मावशीकडे गार्डनमध्ये खेळायला जाण्याचा आग्रह धरला.

शुक्रवार, २६ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास त्या दोन्ही अल्पवयीन मुली गार्डनमध्ये खेळत होत्या. त्यावेळी तेथील एका बेंचवर बसलेल्या आरोपीने त्या दोघींपैकी एकीला जवळ बोलावले. त्याने त्याच्या मोबाइलमधील अश्लील व्हिडीओ त्या मुलीला दाखविला. ती मुलगी बेंचवर बसली असताना त्या विकृताने तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. ती बाब त्या मुलींनी मावशीला सांगितली.

मुलींनी ती बाब सांगताच तिच्या मावशीने दोन- तीनदा त्या गार्डनला जाऊन त्या विकृताचा शोध घेतला. मात्र, तो दिसला नाही. दरम्यान, ३१ मे रोजी दुपारी पुन्हा त्या मुली त्याच गार्डनमध्ये गेल्या. तेव्हा तो विकृत त्यांना दिसून आला. त्यामुळे मुलींच्या मावशीसह त्यांची आईदेखील लगबगीने तेथे पोहोचल्या. गार्डनच्या गेटवरच दोन्ही मुली मायमावशीकडे धावल्या. गार्डनमध्ये असलेल्या त्या विकृताकडे अंगुलीनिर्देश करत शुक्रवारी अश्लील कृत्य करणारा हाच तो, असे त्यांना सांगितले.

...अन् तो पळू लागला

मुलींना आपल्याबाबत महिलांना काहीतरी सांगितले, असे ध्यानात येताच त्या विकृताने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही प्रत्यक्षदर्शी व वाहनधारकांनी त्याला तेथेच पकडले. त्याला चोपदेखील देण्यात आला. त्यानंतर पीडित मुलींच्या आई व मावशीने त्याला पकडून गाडगेनगर पोलिस ठाण्यात आणले. पोलिसी खाक्या बसताच त्याने स्वत:ची ओळख मनोज मेश्राम, अशी सांगितली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAmravatiअमरावती