लब्धप्रतिष्ठितांच्या पार्किंगला अभय :
By Admin | Updated: November 14, 2016 00:13 IST2016-11-14T00:13:45+5:302016-11-14T00:13:45+5:30
रविवारी स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालय परिसरात एका शैक्षणिक संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली.

लब्धप्रतिष्ठितांच्या पार्किंगला अभय :
लब्धप्रतिष्ठितांच्या पार्किंगला अभय : रविवारी स्थानिक केशरबाई लाहोटी महाविद्यालय परिसरात एका शैक्षणिक संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांसह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची वाहने अशाप्रकारे रस्त्यावर लावण्यात आली. वाहतूक शाखेला मात्र ही अनधिकृत पार्किंग दिसू शकली नाही. लब्धप्रतिष्ठितांच्या या रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या अवैध पार्किंगला वाहतूक पोलिसांनीच अभय दिले आहे. शंभरपेक्षा अधिक चारचाकी वाहने या भागात अनधिकृतपणे पार्क करण्यात आल्या आहेत.