पार्किंग झोनची संकल्पना गुंडाळली !
By Admin | Updated: July 15, 2016 00:02 IST2016-07-15T00:02:09+5:302016-07-15T00:02:09+5:30
शहरातील अनियंत्रित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना पोलिसांनी सुचविलेले पार्किंग झोन, नोपार्किंग झोन कागदावरच असल्याचे वास्तव आहे.

पार्किंग झोनची संकल्पना गुंडाळली !
पवारांच्या बदलीचा फटका : अंमलबजावणीला ब्रेक
अमरावती : शहरातील अनियंत्रित वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असताना पोलिसांनी सुचविलेले पार्किंग झोन, नोपार्किंग झोन कागदावरच असल्याचे वास्तव आहे. निर्धोक वाहतूक आणि अतिक्रमण हटविण्याच्या मुद्द्यावर सहकार्याच्या भूमिकेत असलेल्या पोलिस प्रशासनाचे सारेच सर्वेक्षण अहवाल धुळखात पडले आहे.
१२ फेबु्रवारीला चुनाभट्टी परिसरात एका महाविद्यालयीन युवतीचा अपघाती मृत्यू झाला. समाजमन हळहळले. तद्वतच अनियंत्रित वाहतूक, ढासळलेली पार्किंग व्यवस्था असे मुद्दे प्रकाशझोतात आलेत. अनियंत्रित वाहतूकीमुळेच त्या युवतीचा मृत्यू झाल्याचे शिक्कामोर्तब झाल्याने पोलिस व मनपा प्रशासनाला जाग आली. तत्कालिन पोलिस उपायुक्त नितिन पवार यांनी हा मुद्दा अत्यंत गांभीर्याने हाताळला. गांधी चौकासह पाच ठिकाणी जड वाहतुकीच्या अटकावासाठी आडवे लोखंडी बार लावण्यात आले. असामाजिक तत्वांनी त्यावर घाला घातला. तथापि पुढे त्याबाबत महापालिका आणि पोलिसांनी कुठलाही पाठपुरावा केला नाही. पवार यांनी वाहतुकीसंदर्भात दोन दिवस सर्वेक्षण केले.