निंभोरा वसतिगृह अस्वच्छतेवर पालकमंत्र्यांची फटकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST2020-03-17T05:00:00+5:302020-03-17T05:00:58+5:30
अस्वच्छता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. एक हजार प्रवेशक्षमतेच्या या वसतिगृहाला शासनाकडून सर्व सुविधांकरिता अनुदान मिळते. मात्र, येथील गैरसोयींच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे आल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत त्यांनी येथे भेट देऊन पाहणी केली व विद्यार्थ्यांचे भोजन व इतर सुविधांची माहिती घेतली.

निंभोरा वसतिगृह अस्वच्छतेवर पालकमंत्र्यांची फटकार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी निंभोरा येथील समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाला आकस्मिक भेट दिली. तेथील अस्वच्छता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
एक हजार प्रवेशक्षमतेच्या या वसतिगृहाला शासनाकडून सर्व सुविधांकरिता अनुदान मिळते. मात्र, येथील गैरसोयींच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे आल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेत त्यांनी येथे भेट देऊन पाहणी केली व विद्यार्थ्यांचे भोजन व इतर सुविधांची माहिती घेतली.
ग्रामीण भागातील विद्यार्थी वसतिगृहात राहतात. परंतु, भोजनगृह तसेच स्वच्छतागृह व परिसरातील अस्वच्छतेचा विद्यार्थांना त्रास होत असल्यामुळे तातडीने स्वच्छता करावी, असे निर्देश त्यांनी दिले. येथील स्वच्छता कंत्राटदाराकडून मानधन तत्त्वावर काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना चार महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे वास्तव यावेळी उघड झाले. त्यावर संबंधित कंपनीने याची दखल घ्यावी, अन्यथा कठोर कारवाई करू, असे निर्देश समाजकल्याण अधिकाºयांना त्यांनी दिले.
कोरोना विषाणू, दक्ष राहण्याचे निर्देश
देश व राज्यात कोरोनाची आपत्ती ओढवली आहे. हे संकट गडद होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी येथे राहतात, त्यांच्याबाबत या दृष्टीने मास्क व इतर सुविधा तातडीने उपलब्ध करू न द्याव्यात, असे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.