फोटो - इंदूर २६ पी
सेमाडोह ते हरिसाल मार्गात खड्डेच खड्डे, रुग्णांसह प्रवाशांचा जीवघेणा प्रवास
फोटो कॅप्शन - कोलकास ते चिखली फाटा दरम्यान पूर्णता खड्डेमय झालेला इंदूर मार्ग
परतवाडा : परतवाडा ते धारणी-इंदूर मार्गावरील सेमाडोह ते हरिसालपर्यंत आंतरराज्य महामार्ग पूर्णतः खड्ड्यात गेला आहे. प्रवासी, रुग्णांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने या रस्त्याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
परतवाडा-धारणी-इंदूर या मध्य प्रदेशात जाणाऱ्या आंतरराज्य महामार्गावर प्रवासी वाहने व जड वाहने रात्रंदिवस धावतात, तर चिखलदरा व धारणी तालुक्यातील आदिवासी पाड्यातील नागरिकांना तालुका व जिल्हा मुख्यालय जाण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्ग आहे. शासकीय काम असो की आरोग्याचे प्रश्न, यासाठी आंतरराज्य महामार्ग सुरळीत व सुरक्षित राहण्याऐवजी अपघाताला निमंत्रण व जिवाला धोका देणारा ठरला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने दुचाकीस्वारांचा अपघात होत असल्याचे चित्र दररोजचे झाले आहे. दुसरीकडे रात्रीच्या अंधारात चारचाकी वाहनधारकांनासुद्धा जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या मार्गाची दुरुस्ती तात्काळ करण्याची गरज आहे.
-----------------
बॉक्स रस्ता हरवला, खड्डेच खड्डे
कोलकास ते चिखली फाटा, हरिसालपर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने तात्पुरती डागडुजी करणे गरजेचे आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे त्याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांचं प्रवाशांनी केला आहे.
कोट
कोलकास ते हरिसालपर्यंत मोठ्या प्रमाणात रस्त्यांची चाळण झाली आहे. तात्पुरती व्यवस्था म्हणून खड्डे बुजवून रुग्णांसह नागरिकांना दिलासा संबंधित विभागाने द्यावा. या रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची भीती आहे.
- मुकुंद देशमुख, सामाजिक कार्यकर्ता, परतवाडा
--------------
संबंधित कामाला तांत्रिक मंजुरात मिळाली असून निविदा काढून लवकरच नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. हरिसालपर्यंत हा मार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न आहे.
- मिलिंद पाटणकर, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिखलदरा
250821\5622img-20210815-wa0141.jpg
खड्ड्यात गेला परत्वडा इंदूर आंतर राज्य महामार्ग