दूरसंचार विभाग झाला पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 22:35 IST2019-01-01T22:34:55+5:302019-01-01T22:35:18+5:30

भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) विभागाकडून ग्राहकांना दिले जाणारे दूरध्वनी अथवा मोबाईलचे देयके आता ई-मेल किंवा मॅसेजद्वारे पाठविले जातील. १ जानेवारीपासून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात असून, दूरसंचार विभागाची वाटचाल पेपरलेसकडे सुरू झाल्याची माहिती बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक सुनीलकुमार अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली.

Papers held in the Department of Telecom | दूरसंचार विभाग झाला पेपरलेस

दूरसंचार विभाग झाला पेपरलेस

ठळक मुद्देपत्रपरिषद : आॅनलाईनच मिळणार देयके, कागदी देयके बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) विभागाकडून ग्राहकांना दिले जाणारे दूरध्वनी अथवा मोबाईलचे देयके आता ई-मेल किंवा मॅसेजद्वारे पाठविले जातील. १ जानेवारीपासून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यात असून, दूरसंचार विभागाची वाटचाल पेपरलेसकडे सुरू झाल्याची माहिती बीएसएनएलचे प्रधान महाप्रबंधक सुनीलकुमार अग्रवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेतून दिली.
अग्रवाल यांनी ही ग्राहकांना नववर्षाची भेट असल्याचा दुजोरा दिला. यापुढे देयके ही बीएसएनएल मार्फत ग्रो. ग्रीन प्रकल्पाअंतर्गत ई- मेल आयडी नोंदणीकृत केले आहे. नोंदणीकृत ग्राहकांच्या ई-मेल आयडीवर पाठविली जाणार आहे. विशेष म्हणजे या देयकांमध्ये १० रूपयांची सुट मिळणार असल्याचे मुख्य लेखा अधिकारी विवेक कुलकर्णी यांनी सांगितले.
भारत सरकारच्या डिजिटल इंडिया ई-गव्हर्नन्स योजनेतंर्गत झाडे वाचविणे, पर्यावरणाची सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीकोणातून कागदी प्रिन्ट केलेली बीले सर्व ग्राहकांना जी अद्यापर्यत पोस्टामार्फत पाठविण्यात येत होती. ती आता बंद करण्याचा निर्णय दूरसंचार विभागाने घेतला आहे. त्यामुळे टेलिफोन ग्राहकांनी आपला ई-मेल आयडी गो. ग्रीन प्रकल्पांतर्गत नोंदणी करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय व निमशासकीय कार्यालयासह आदींनी रेकॉर्ड करता कागदी बिल आवश्यक आहे. त्यांनी गो.ग्रीन मध्ये आपला ई-मेल आयडी नोंदणीकृत करून ई-मेलवर बिल प्राप्त करून घेण्याचे आवाहन बीएसएनएलने केले आहे. ग्राहकांनी मोबाईल क्रमांक बीएसएनएलकडे नोंदणीकृत करून घ्यावे, असे बीएसएनएलने कळविले आहे. माय बीएसएनएल अ‍ॅप डाऊनलोड करून देयकाबाबतचे विस्तृत विवरण ग्राहकांना कळणार असल्याचे यावेळी कुलकर्णी यांनी सांगितले. बीएसएनएलचे डीजीएम डी. बी. डांगे, पी.एम. धोबे, ए.डी. नांदूरकर उपस्थित होते.
टेलिफोन नंबर सांगूनही भरता येणार देयके
छापील कागदी बिले यापुढे ग्राहकांना मिळणार नाही. त्याकरिता पोस्टमास्तर जनरल यांना बीएसएनएलने पत्राव्दारे मोबाईलवरून मॅसेजमधील टेलिफोन बिलाचे देयके स्वीकारावे अशा सूचना दिल्या आहेत. सर्व टेलिफोन ग्राहक बीएसएनएलच्या तसेच पोस्टाच्या सर्व बिल भरणा केंद्रात मोबाईलवरील संदेश दाखवून बिल भरू शकतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Papers held in the Department of Telecom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.