तलवारीने दहशत, आरोपीच्या मुसक्या आवळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:16 IST2021-08-25T04:16:50+5:302021-08-25T04:16:50+5:30
गौरव प्रकाश वाटकर (२०, वर्षे, रा. महादेव मंदिर जवळ, महाजनपुरा) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३६ इंच पात्याची ...

तलवारीने दहशत, आरोपीच्या मुसक्या आवळल्या
गौरव प्रकाश वाटकर (२०, वर्षे, रा. महादेव मंदिर जवळ, महाजनपुरा) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३६ इंच पात्याची लांबी असलेली तलवार जप्त करण्यात आली. त्या तलवारीमागे पितळी गार्ड व लेदरचे काळे कव्हरदेखील होते.
गुन्हे शाखेचे पथक आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना अंदाजे २० ते २२ वर्षाचा तरूण महाजनपुरा येथे हातामध्ये तलवार घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गौरव प्रकाश वाटकर याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम ४/२५ सहकलम १३५ मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेश मुंढे, पोहेका राजूआप्पा बाहेणकर, फिरोज खान, सतीश देशमुख, दिनेश नांदे, निवृत्ती काकड यांनी ही कारवाई केली.