पंढरपूर रेल्वे विशेष गाडी रवाना

By Admin | Updated: July 11, 2016 00:08 IST2016-07-11T00:08:10+5:302016-07-11T00:08:10+5:30

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल, रुख्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे वारकऱ्यांना ये- जा करता यावे,...

Pandharpur special train will depart | पंढरपूर रेल्वे विशेष गाडी रवाना

पंढरपूर रेल्वे विशेष गाडी रवाना

रविवारी प्रवासी संख्येत वाढ : १२, १३ जुलै रोजी पुन्हा जाणार
अमरावती : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल, रुख्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे वारकऱ्यांना ये- जा करता यावे, यासाठी पंढरपूर विशेष गाडी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ९ व १० जुलै रोजी नवीन अमरावती (अकोली) रेल्वे स्थानकावरून गाडी रवाना करण्यात आली. शनिवारी ३३४ तर रविवारी ६५९ प्रवाशांनी या गाडीने प्रवास केल्याची नोंद आहे.
पंढरपूरकडे शनिवारी पहिल्यांदा विशेष रेल्वे गाडी नया अमरावती रेल्वे स्थानकाहून दुपारी २.३० वाजता रवाना करण्यात आली. या गाडीने प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांचे रेल्वे प्रशासनाच्यावतीने वाणिज्य निरिक्षक व्ही.डी.कुंभारे, शिवसेनेचे बाळा तळोकार, रेल्वेचे सयाम आदींनी स्वागत केले. रविवारी या विशेष गाडीने पंढरपूरकडे जाण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी उसळली होती. शनिवारी नया अमरावती रेल्वेस्थानकाहून ३३४ प्रवासी रनाव झाले असून रेल्वेला ४८ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. तसेच रविवारी ६५९ प्रवासी पंढरपूरकडे रवाना झाले असून २ लाख ९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आता पंढरपूर विशेष रेल्वे (गाडी क्र.०११५५) ही नया अमरावती रेल्वे स्थानकाहून १२ व १३ जुलै रोजी रवाना होईल. पंढरपूर ते अमरावती ( गाडी क्र. ०१५६) ११, १६ व १७ जुलै रोजी पंढरपूर येथून सोडली जाईल. या गाडीत एकूण ९ डबे राहतील. न्यू अमरावती, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगांव, जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड पुढे पंढरपूरकडे रवाना होईल.

Web Title: Pandharpur special train will depart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.