पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून
By Admin | Updated: November 1, 2014 22:43 IST2014-11-01T22:43:28+5:302014-11-01T22:43:28+5:30
जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवार ३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. २३ नोव्हेंबरला मतदान व २४ नोव्हेंबरला

पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया ३ नोव्हेंबरपासून
अमरावती : जिल्ह्यातील तिवसा, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यातील पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सोमवार ३ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. २३ नोव्हेंबरला मतदान व २४ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर केवळ दहा दिवसांत पुन्हा या तिन्ही तालुक्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
तिवसा व चांदूररेल्वे तालुक्याच्या विभाजनातून धामणगाव तालुक्याची २० वर्षांपूर्वी निर्मिती झाली. त्यानंतर या तिन्ही तालुक्यात पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गटांची फेररचना करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील अन्य पंचायत समिती निवडणुकीसोबत या तालुक्यांची निवडणूक होत नाही. या तिन्ही तालुक्यांमधील २० पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे. विधानसभेनंतर लगेच निवडणूक असल्याने राजकीय रंगत चढली आहे.