पंचायत समिती सभापती राजेश वाटाणे यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:13 IST2021-03-05T04:13:11+5:302021-03-05T04:13:11+5:30
चांदूर बाजार : पंचायत समितीचे विद्यमान सभापती राजेश वाटाणे यांनी नुकताच राजीनामा दिला. सभापतीपदाचा पदभार उपसभापती नितीन ...

पंचायत समिती सभापती राजेश वाटाणे यांचा राजीनामा
चांदूर बाजार : पंचायत समितीचे विद्यमान सभापती राजेश वाटाणे यांनी नुकताच राजीनामा दिला. सभापतीपदाचा पदभार उपसभापती नितीन टाकरखेडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते बच्चू कडूप्रणित प्रहार पक्षाचे सदस्य आहेत.
राजेश वाटाणे यांनी प्रहार नेते राज्यमंत्री बच्चू कडू यांना एक वर्षाच्या कालावधीनंतर राजीनामा देऊ, असा शब्द दिला होता. त्या अनुषंगाने त्यांनी एक वर्षाचा कालावधी पूर्ण होताच आपला शब्द पाळत पदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांच्याकडे सोपविला. त्यानुसार आठ दिवसांपूर्वी अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला. त्या दिवसापासून पंचायत समितीच्या सभापतीपदाचा पदभार उपसभापती यांच्याकडे आहे. त्याअनुषंगाने १० मार्च रोजी ११ ते २ पर्यंत पंचायत समितीच्या सभागृहात नवीन सभापतीची निवड होणार आहे. सध्या सभापतीपदाचा कालावधी १ वर्षाचा शिल्लक राहिला आहे. पक्षीय बलाबल बघता भाजपच्या एकमेव सदस्याचा पाठिंबा प्रहारला असल्यामुळे प्रहारचाच सभापती होणार, हे मात्र निश्चित. चर्चेनुसार, प्रहारच्या कु-हा पंचायत समिती सर्कलच्या सदस्य वनमाला सुरेश गणेशकर या सभापती होणार असल्याची माहिती आहे.