पदाधिकाऱ्यांवर पंचायत समिती सभापती नाराज

By Admin | Updated: September 21, 2015 00:12 IST2015-09-21T00:12:54+5:302015-09-21T00:12:54+5:30

जिल्हा परिषदेतील विविध समित्यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच...

Panchayat Committee chairman angry at officials | पदाधिकाऱ्यांवर पंचायत समिती सभापती नाराज

पदाधिकाऱ्यांवर पंचायत समिती सभापती नाराज

खंत : जिल्हा परिषद स्तरावर कामे होत नसल्याचा परिणाम
अमरावती : जिल्हा परिषदेतील विविध समित्यांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असतानाच आता पंचायत समिती सभापतींनीही योजनांचा लाभ मिळत नसल्याची तक्रार जि.प. अध्यक्ष व सीईओंकडे तोंडी स्वरुपात व यापूर्वी लेखी निवेदनात केल्या आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या वाटपात पंचायत समिती सभापतींचाही विचार करावा, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यातील १४ पंचायत समितीचे सभापती हे जि.प.चे पदसिद्ध सदस्य असतात. पंचायत समिती सभापती तालुक्याच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे. असे असतानाही पदाधिकाऱ्यांकडून पंचायत समिती सभपतींना दुय्यम वागणूक दिली जाते. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व समितीचे सभापती तालुका सभापतींना विश्वासात घेत नाहीत. योजनांच्या अंमलबजावणीत पंचायत समिती सभापतींना जाणीवपूर्वक बाजूला ठेवतात त्यांना सहभागी करून घेत नाहीत त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य असूनही योजनांच्या बाबतीत आमच्यावर अन्याय होत आहे. सर्व सभापतींना जिल्हा परिषद स्वनिधीतून तरतूद करावी. जिल्हा नियोजन समितीमध्ये सर्व सभापतींना स्थान मिळावे, बांधकाम विभागाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विकासकामात सदस्यांप्रमाणे पंचायत समिती सभापतींनाही निधी मिळावा, पंचायत समितीमधील अनेक कर्मचारी प्रतिनियुक्तीवर जिल्हा परिषदेत काम करीत आहेत, त्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात आदी मागण्या केल्या आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Panchayat Committee chairman angry at officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.