शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

पाणीटंचाईच्या लागल्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 22:50 IST

विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील १० गावांत पाणीटंचाई असून, त्या गावांमध्ये आता टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

ठळक मुद्देउपाययोजनांवर भर : अमरावती शहरासह जिल्हाभरात ठरावीक दिवशीच पाणीपुरवठा, ग्रामस्थांची पायपीट

सध्या उन्हाच्या तीव्र झळा लागत असल्याने पाण्याची पातळी कमालीपेक्षा खाली गेली. यंदा अत्यल्प पाऊस झाला. पाण्याची आवक नसल्याने विहिरीतील पाणीसाठा अल्पावधीतच संपण्याच्या मार्गावर आहेत. अमरावतीला अप्पर वर्धा धरणाचा आधार असला तरी बहुतांश ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. कायम दुष्काळाच्या छायेत असलेल्या नांंदगाव तालुक्यातील चांदी प्रकल्पाचा जलसाठा १४ टक्क्यांवर आला आहे, तर वरूड तालुक्यात पाण्याअभावी संत्राझाडे तोडण्याचा निर्णय शेतकरी घेत आहेत. येत्या काही दिवसांत ही स्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्हे आहेत.नरेंद्र जावरे।आॅनलाईन लोकमतचिखलदरा : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील १० गावांत पाणीटंचाई असून, त्या गावांमध्ये आता टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.उन्हाचा पारा चढू लागताच मेळघाटातील आदिवासी पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. तालुक्यातील पस्तलई आणि तोरणवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविल आहे. या दोन्ही गावांची सद्यस्थिती पाहून लवकरच टँकरने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी सांगितले. तालुक्यातील १० गावांमध्ये जानेवारी ते मार्च या महिन्यात टँकर लागण्याची अपेक्षा होती; मात्र एप्रिल ते जून या महिन्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागेल. भांदरी, मोथाखेडा, तारूबांदा, भीलखेडा, पाचडोंगरी, खटकाली, आडनदी, मनभंग येथे टँकरने पाणीपुरवठा होईल.हातपंप निकामी, पथक अचलपुरातविस्तारामुळे आदिवासींना तालुका मुख्यालय येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. तालुक्यात एकूण ५५ ग्रामपंचायतींमध्ये जवळपास १६० गावे आहेत. त्यांच्यासाठी ८५ नळयोजना व १६८ हातपंप आहेत. ३७ वीजपंप, ४९ सार्वजनिक विहिरी, ३८ खाजगी विहिरी असून, संभाव्य पाणीटंचाई पाहता, १५ विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहेत. अनेक ग्रामपंचायतींच्या बेपर्वाईमुळे पाणीपुरवठा योजनासुद्धा निकामी पडल्याचे चित्र आहे. चिखलदरा तालुक्यासाठी स्वतंत्र हातपंप दुरुस्ती पथक असले तरी त्याचे मुख्यालय अचलपूर पंचायत समिती असल्यामुळे वेळेवर हातपंप दुरुस्त होत नसल्याच्या तक्रारी आहेत. चिखलदरा तालुक्यासाठी तीन स्वतंत्र हातपंप पथक देण्याची मागणी करण्यात आली आहे.‘सिडको’च्या विकासकामांना फटका... विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथे दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. शासनाने कोट्यवधी रुपयांच्या योजना येथे जाहीर केल्या असल्या तरी पाण्यासाठी चिखलदरावासीयांची मागील दहा वर्षांपासून वणवण सुरू आहे. साडेपाचशे कोटी रुपये खर्चून सिडकोचा प्रकल्प येथे राबवण्यास सुरुवात झाली असली तरी पाण्याअभावी अनेक विकासकामे खोळंबली आहेत. राज्य आणि राज्याबाहेरून येणाऱ्या पर्यटकांची संख्या उन्हाळ्यात मंदावल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथील व्यापारावरसुद्धा परिणाम झाला आहे.