पाळा ग्रामपंचायत बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:31 IST2021-01-13T04:31:25+5:302021-01-13T04:31:25+5:30
२५ लाख रुपये मिळणार : मोर्शी : तालुक्यातील ११ सदस्यीय पाळा ग्रामपंचायत अविरोध झाली आहे. १५ जानेवारी रोजी होऊ ...

पाळा ग्रामपंचायत बिनविरोध
२५ लाख रुपये मिळणार :
मोर्शी : तालुक्यातील ११ सदस्यीय पाळा ग्रामपंचायत अविरोध झाली आहे. १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या या निवडणुकीसाठी केवळ ११ उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक प्रशासनाने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. अविरोध सदस्यांमध्ये चंपत नेवारे, अजय राऊत, राजेश घोडकी, प्रीती जिचकार, वर्षा घोरमाडे, संध्या राऊत, सरिता कुकडे, इंदिरा गोडग्राम, शोभा सातपुते, कांता युवनाते, करिष्मा सोनागोते यांचा समावेश आहे.
मोर्शी येथे पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार देवेंद्र भुयार व माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अविरोध ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने ९ जानेवारी रोजी बैठक घेण्यात आली. त्यात ग्रामपंचायत अविरोध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे नरेंद्र ऊर्फ बंडू जिचकार, मोरेश्वर गुळदे, विलास राऊत, प्रकाश घोरमाडे, अजय गुळदे यांनी विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला पाळा सालबर्डी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय गुडदे, तर प्रास्ताविक नरेंद्र जिचकार यांनी केले. आमदार देवेंद्र भुयार यांनी जाहीर केल्याप्रमाणे बिनविरोध झालेल्या पाळा ग्रामपंचायतला आमदारांकडून २५ लाख रुपये निधी मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
------