श्री अतिशय पार्श्वोदय तीर्थ येथे पावन वर्षायोग
By Admin | Updated: July 30, 2016 00:06 IST2016-07-30T00:06:48+5:302016-07-30T00:06:48+5:30
सातपुडयाच्या कुशीत चुडामणी नदीकाठावर प्राचीन भगवान पार्श्वप्रभू यांचे मंदिर आहे.

श्री अतिशय पार्श्वोदय तीर्थ येथे पावन वर्षायोग
नागठाणा येथे कार्यक्रम : मुनीश्री १०८ सुवीरसागरजी महाराज यांचे प्रवचन
संजय खासबागे वरुड
सातपुडयाच्या कुशीत चुडामणी नदीकाठावर प्राचीन भगवान पार्श्वप्रभू यांचे मंदिर आहे. येथे मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांचा पावन वर्षायोग (चातुर्मास) कार्यक्रम सुरू झाला असून मध्यप्रदेश महाराष्ट्रासह आदी परिसरातील हजारो जैन बांधव उपस्थित होते.
सातपुडा पर्वतात चुडामणीच्या काठावर मध्यप्रदेश महाराष्ट्र सीमेवरील वरुड तालुक्यातील श्रीक्षेत्र नागठाणा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीसुद्धा १९३९ मध्ये चातुर्मास घेतले होते, तर यांनतर १९७३ पासून सतत श्रीसंत अच्युत महाराज यांनी साधना शिबिर सुरू करून दरवर्षी कार्यक्रम घेतले जाते.येथे श्री अतिशय पार्श्वोदय तीर्थ असून प्राचीन भगवान पार्श्वप्रभू याचे मंदिर आहे. पहिल्यांदा मुनीश्री १०८ सुवीरसागरजी महाराज यांचे पावन वर्षायोग (चातुर्मास) कार्यक्रमाला प्रांरभ झाला आहे. १६ जुलै रोजी मुनीश्री १०८ सुवीरसागरजी महाराज यांचे पावन तीर्थक्षेत्रावर आगमन झाले. १० हजार चौरस फूट क्षेत्रावर सन्मती अतिथी भवनाचे बांधकाम सुरू असून निसर्गरम्य परिसरामध्ये मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले होते. यानंतर गुरूपौर्णिमेचा उत्सव साजरा झाला. विशेष गुरुपूजनाचे आयोजन करण्यात आले होते. २४ जुलै रोजी मांगलिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये सकाळी ८ वाजता अभिषेक, पूजन, १० वाजता आहारचर्या, ११ वाजता ध्वजारोहण, मंगलाचरण, सकाळी साडेअकरा वाजता कलश स्थापना विधी आणि दुपारी २ वाजता वात्सल्य भोजनाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी विधानाचार्य पंडित संजय सरस चिचोली, पंडित संदीप भय्या नागपूर, पंडित अजित शास्त्री रायपूर तसेच संगीतकरार सुवीरस्वर मंच चिंचोली यांनी विविध धार्मिक कार्यक्रम सादर केला. या श्री अतिशय पार्श्वोदय तीर्थावर मध्यप्रदेश महाराष्ट्रास ह इतर परिसरातील हजारो जैन बांधव उपस्थित होते. पावन वर्षायोग कार्यक्रम अरविंद भागवतकर, कमलेश खडके, विवेक सोईतकर, अनूप शहा, जयचंद्र ठोले, प्र्रकाश मांडवगडे, प्रदीप आगरकर, देशबंधू महात्मे, विनय शहा सहश्री अतिशय पार्श्वोदय तीर्थ समिती, सुवीरसागर चातुर्मास समितीचे सदस्य सहकार्य करीत आहे.