Amravati News मेळघाटच्या धारणी तालुक्यात रेबिजमुळे लांडगा चवताळल्याची धक्कादायक माहिती आहे. यामुळे जंगलातील वाघ, बिबट व इतरही वन्यप्राण्यांना धोका होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. ...
ट्विटर व फेसबुकवरील 'त्या' पोस्ट शहरात जातीय तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचे निरीक्षण सायबर पोलिसांनी नोंदविले आहे. याप्रकरणी ‘वन टू वन’ पोस्टची पाहणी केल्यानंतर कोतवाली, राजापेठ पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
कोरोनाच्या दोन वर्षांत विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला नाही, असा आरोप कर्मचारी संघाच्यावतीने करण्यात आला आहे. ...
मोहम्मद फिरोज अब्दुल अजीज या ट्रकचालकाच्या खात्यात दहा दिवसांपूर्वी १४ लाख रुपये जमा झाले होते. मात्र, त्यांनी एक रुपयाही न काढता, बँकेत याबाबत माहिती दिली. बँकेत बोलावल्यावर पैसे परत करण्याच्या प्रक्रियेत पूर्ण सहकार्य केले. ...
गावठाणातील मिळकतींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येऊन प्रतिमांचे भूसंदर्भिकरण व ॲथोरेक्टीफिकेशन करण्यात येणार आहे. यासोबतच गावठाणातील मिळकतींचा डिजिटाईज्ड नकाशा व आज्ञावली विकसित करण्यात येणार आहे. ...
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांचे रझा अकादमीच्या पदाधिकाऱ्यांसोबतचे छायाचित्र प्रसारित केले जात आहे, तसे मुख्यमंत्र्यांचेही छायाचित्र आहे. ते का प्रसारित केले जात नाही, असा प्रश्न फडणवीस यांनी राज्य सरकारमधील मंत्र्याला केला. ...
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यादरम्यान केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावतीच्या जनतेचे आभार मानले. अमरावतीची जनता सुज्ञ आहे. ते दंगेखोरांच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा विश्वास ना. यशोमती ...
राज्य सरकार १३ नोव्हेंबरच्या घटनेला जास्त फोकस करीत आहे. मात्र, १२ नोव्हेंबर रोजी अल्पसंख्याकांनी शहरात जी ‘ॲक्शन’ केली, त्याची १३ नोव्हेंबर रोजी ‘रिॲक्शन’ होती. भाजपने बंदचे आवाहन केले होते, हे आम्ही कबूल करीत आहे. कारण हिंदू असुरक्षित असेल तर भाजप ...