विद्यापीठ अंतर्गत २३ अभियांत्रिकी, तर १८ फार्मसी महाविद्यालयांत परीक्षांचे केंद्र असतील. अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ व बुलडाणा या पाचही जिल्ह्यातील सुमारे ४० हजार विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहे. १३ ते २७ जानेवारी दरम्यान अभियांत्रिकी, फार्मसी ...
दारूची पार्टी करून, घरी मुक्कामी राहणाऱ्या व वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पतीच्या मित्राला लाथाडून एका महिलेने हिमतीने स्वसंरक्षण केले. तो जसे करतो तसे करू दे, असे निर्लज्जपणे सांगणाऱ्या पतीलाही तिने चपराक हाणली. ...
नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर असे दोन महिने एसटी कर्मचारी संपावर गेल्याने हाती पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासत आहे. एसटी कर्मचारी राज्य शासनामध्ये विलिनीकरणावर ठाम आहेत. शा ...
लांग स्टेपलच्या कापसाला यंदा ६,०२५ रुपये क्विंटल हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे; परंतु हंगामाचे सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावपेक्षा जास्त दर मिळत आहे. यंदा हलक्या जमिनीच्या भागात दोन वेच्यात उलंगवाडी होत आहे तर भारी जमिनीमध्ये अतिपावसाने बोंडसडचे सं ...
अमरावती जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे संत्रा, लिंबू व मोसंबीच्या बागांचे नुकसान झाले आहे. यामुळे झाडाच्या फांद्या व खोडावरील सालीला जखमा झाल्याने त्यातून बुरशीजन्य रोगांचे संक्रमण होण्याची शक्यता आहे. ...
अमरावती विद्यापीठाने अनाथ, अपंगांसाठी आयुष्य झिजवणारे आणि तब्बल १२३ बेवारस मुला-मुलींचे बाप होण्याचे भाग्य असलेल्या शंकरबाबांना डी.लिट उपाधी बहाल करण्याचा निर्णय म्हणजे अमरावती विद्यापीठाच्या इतिहासाला उजळणी देणारा ठरला. विद्यापीठाचे डॉ. संदीप वाघुळे ...
जिल्हा सामान्य रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात नोंदणीकरिता सकाळी ९ ते दुपारी २ वाजतापर्यंत मोठी गर्दी असते. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळण्याकरिता आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केल्यामुळे त्यांचीदेखील अगदी जवळजवळ गर्दी दिसून आली. त्यामुळे रुग्णालयात त ...
शुक्रवारी ९७९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असता ११ संक्रमितांची नोंद झाली. ४८ तासांत २,२६१ नमुन्यांमध्ये झालेली २४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे. ...