राज्याचे आदिवासी विकास विभागाचे कार्यालये, शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहे, एकलव्य निवासी शाळा आदींसाठी आवश्यक वस्तू, सेवा खरेदी ही केंद्र सरकारच्या गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस (जेम) पोर्टलवरून करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
भारतीय वनसेवेतील आठ वरिष्ठ वनाधिका-यांचे बदली आदेश महूसल व वने विभागाने काढले आहे. यात ठाणे येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आणि नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिलीप सिंग यांना बढती मिळाली आहे. ...
रुक्मिणीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपुरातील यात्रा महोत्सवाची सांगता नुकतीच झाली. लाखोंची उलाढाल असल्याने येथे हजेरी लावणारे व्यावसायिक यंदा मात्र नाखूश दिसून आले. ...
मेळघाटमधील धारणी आणि चिखलदरा या दोन्ही पंचायत समित्यांमधील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक आठवड्यातून फक्त दोन दिवस शाळेत हजर राहून शैक्षणिक कार्य करीत आहेत. ...
राज्यभरात केवळ सात टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकलेल्या आणि शास्त्रज्ञ निर्मितीच्या प्रक्रियेत विशेष प्रतिष्ठेच्या गणल्या जाणाऱ्या 'होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षे'त अमरावती येथील शाश्वत शाळेच्या सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. ...
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वरुड तालुक्यातील गव्हाणकुंडला विभागीय स्तराचा प्रथम, टेंभूरखेड्याला जिल्ह्यातून प्रथम आणि पिंपळशेंडाला पाचवा पुरस्कार प्राप्त झाला. ...