ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
वाहनाचा मनपसंत क्रमांक मिळविण्यासाठी गाडीमालकांनी परिवहन विभागाकडे तब्बल ७७ कोटी रुपये मोजलेत. एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यांतील ही आकडेवारी आहे. ...
वन्यजिवांचा शिकारींपासून बचाव करता यावा, यासाठी ‘फॉरेस्ट मेजर’ हा उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्प राबविणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १०० जणांची निवड केली जाणार असून, यात विद्यार्थ्यांना प्राधान्य राहील. ...
वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही कर्जमाफी न मिळाल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील राजना या गावच्या नरेंद्र रामचंद्र मुंदे या तरुण शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी तहसील कार्यालयात अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. ...
राज्याचे ‘लँकेशायर’ अशी ओळख असलेल्या व-हाडाची यंदा गुलाबी बोंड अळीने वाट लावली आहे. सद्यस्थितीत कपाशीची ९६ टक्के बोंडे सडली असल्याचे जिल्हा समितीने तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या पाहणीत आढळून आले. ...
परतवाडा वनवर्तुळ अंतर्गत चौसाळा शिवारात एक काळवीट रविवारी मृतावस्थेत आढळले. संबंधित वनाधिकाऱ्यांनी त्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत पोस्टमार्टेम न करता दफनविधी उरकल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. ...
आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील तहसील कार्यालयात तालुकाध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता ठिय्या आंदोलन करण्यात आले.गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीच्या पिकाचे ९० टक्क््यांवर नुकसान झाले ...
तालुक्यातील रस्त्याच्या निधीवर शासनाकडून दुजाभाव होत असून, रस्त्याचे सर्वाधिक प्रमाण असतानाही निधी सर्वांत कमी मिळत असल्याचा आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी सोमवारी सायंकाळी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. ...