उत्कृष्ट फलंदाजी करणा-या भारती फुलमाली यांची भारतीय महिला क्रिकेट कर्णधार मिथाली राज यांच्या इंडिया रेड या संघात निवड झाली आहे. भारतीय महिला क्रिकेट चॅलेंजर ट्रॉफी ४ जानेवारी २०१८ पासून सुरू होत असलेल्या सामन्यात ती खेळणार आहे. ...
वेतनश्रेणी आणि तांत्रिक कामांवर बहिष्कार घालतानाच संप पुकारण्याचे धारिष्ट्य दाखविणा-या राज्यातील वनकर्मचा-यांना अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे. एखाद्या संघटनेच्या इशाºयावर संप करणे आता महागात पडणार असून वनविभागातील काही सं ...
शहरातील गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील आझादनगरमध्ये जुन्या वादातून आज शनिवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास दोन गट समारासमोर आले. त्यांच्यात शाब्दीक वादानंतर सशस्त्र हल्ला झाला. ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीचे उत्पादन कमी होत असले तरी हंगामापूर्वीच तुरीचे भाव आधारभूत दराच्या किमान दीड ते दोन हजार रुपये कमी आहेत. सद्यस्थितीत चार केंद्रांवर २९ शेतकऱ्यांनी २६०४ क्विंटल तुरीची आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. ...
दैनंदिन स्वच्छतेत प्रचंड हाराकिरी करून प्रभागवासीयांचे आरोग्य धोक्यात आणण्याचा ठपका असलेल्या ‘इसराजी’ या स्वच्छता कंत्राटदाराला काळ्या यादीतून बाहेर काढण्यात आले आहे. ...
तालुका मुख्यालयी सर्व महत्त्वपूर्ण कार्यालये एकाच इमारतीत रहावे, यासाठी सात कोटींची प्रशासकीय इमारत दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आली. मात्र, या नव्या इमारतीच्या स्वच्छतेसाठी तालुका प्रशासन गंभीर नाही. ...
थर्टी फर्स्ट, ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षांच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळते. या उत्साहाच्या वातावरणात कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ नये, यासाठी अमरावती पोलीस सज्ज झाले आहे. ...
यंदाच्या खरिपात दीड लाख हेक्टरवरील कपाशी गुलाबी बोंडअळीने उद्ध्वस्त झाली. या बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शासनाने कापूस उत्पादकांना हेक्टरी ३० हजार ८०० रूपयांची मदत जाहीर केली. ...
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागात इंधनाच्या नोंदी न घेता कागदोपत्रीच लाखो रुपयांची उचल केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. याप्रकरणी विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ...
पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जरूड येथे क्रिकेट सट्ट्यावर धाड टाकण्यास गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येथून देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतूस जप्त केले. ...