वाळू लिलावाचे सुधारित धोरण व त्यासंदर्भातील वेळापत्रकाबाबतचा अध्यादेश महसूल विभागाने जारी केला असून, त्यानुसार नदीपात्रातील वाळू साठ्याच्या लिलावाच्या ग्रामसभेची शिफारस बंधनकारक करण्यात आली आहे. ...
अंजनगाव सुजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश एम.एस. काळे यांचे स्टेनो कमलाकर अंबाडकर यांचा मोबाइल चोरी झाल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी पोलिसांनी चोरट्यास अटक केली. ...
आदिवासी विकास विभागाच्या ५५२ आश्रमशाळांसाठी सीसीटीव्ही खरेदीच्या ई-निविदेस राज्य शासनाने ‘ब्रेक’ दिला आहे. परिमाणी, यापूर्वीची ई-निविदा प्रक्रिया गुंडाळण्यात आली आहे. ...
अचलपूर नगरपालिकेने १ जानेवारीपासून अनधिकृत पोस्टर, बॅनर, फ्लेक्स व पताके काढण्याचा सपाटा सुरू केला आहे. अचलपूर, परतवाडा शहरातील झाडांसह इलेक्ट्रिक पोलवरील शेकडो बॅनर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काढले. ...
येथील शरीरसौष्ठवपटू विजय भोयर याला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने टायगर अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. तो वाघांचे संगोपन, संरक्षणासाठी प्रचार व प्रसार करणार असून, लवकरच तसा करार होणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : तिवसा-चांदूर रेल्वे राज्य महामार्गावर असलेला कुºहानजीक भोगावती नदीवरील पुलाचे दोन्ही बाजूचे कठडे दुरुस्त करावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी पुलावर मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावर कठडे ...
महापालिकेच्या अग्निशमन विभागाने दोन कोटी रुपयांच्या वाहन खरेदीसाठी राबविलेली निविदाप्रक्रिया संदीप देशमुख या तथाकथित कन्सल्टंटने ‘मॅनेज’ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महापालिकेतील प्रत्येक विभागात त्यांचा स्वैर वावर आहे. ...
कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या निषेधार्थ भारिप-बमसंचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आवाहनाप्रमाणे विविध संघटनांनी महाराष्ट्र बंद पुकारला होता. यादरम्यान शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांवर भ्याड हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ...