जिल्ह्यातील अतिशय महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लौकिक असलेले अचलपूर शहरातील बसस्थानक भंगार अवस्थेला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, तालुका मुख्यालय असतानाही प्रवाशांसाठी नव्हे, तर बसस्थानक चोरटे, अवैध धंदेवाले, प्रेमीयुगुल, दारूड्यांसाठी कमालीचे उपयोगी ठरत आहे. ...
दर्यापूर-अंजनगाव सुर्जी मार्गावर पकडलेल्या २० लाखांच्या गुटख्याचा तपास बिरबलाच्या खिचडीप्रमाणे सुरू आहे. महिना लोटूनही माल कुणाकडे जात होता आणि मुख्य आरोपी कोण, हे उघड झालेले नाही. ...
आॅटोरिक्षातील प्रवाशाचे दागिने व रोखीने भरलेली बॅग चालकाने परत करून माणुसकीचे दर्शन घडविले. या कार्याबद्दल नागपुरी गेट पोलिसांनी आॅटोरिक्षाचालकाचा सत्कार केला. ...
नागाचा दंशच नव्हे, तर फुत्कारही काळजाचा ठोका चुकवतो. त्यात जोडी म्हटल्यानंतर तर काही सांगायलाच नको. मात्र, चांगापूर येथे नागाच्या एका जोडीला सर्पमित्रांनी परिश्रमपूर्वक पकडून जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले. ...
घर-दार सोडले... दहा वर्षांपासून पायाला भिंगरी लागल्यागत भटकंती... कुणीही मनोरुग्ण म्हणून टाळेल... मात्र, सोमवारी त्याचे नशीब खुलले. शहरात भटकंती करणाऱ्या या ५० वर्षीय इसमाला स्माइल फाऊंडेशनच्या पुढाकाराने अखेर कुटुंबाचे सान्निध्य मिळाले. ...
महिनाभरापासून रेती व्यावसायिकांकडून लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या फरार आयपीएस विजयकृष्ण यादव याचा १४ फेब्रुवारीला नांदेड सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्याला दोन आठवडे होऊनही अमरावती एसीबी तपास त्याचा शोध घेऊ शकले नाही. ...