येथील जैन बहुउद्देशीय संस्थेद्वारा दिला जाणारा भगवान महावीर अवार्ड यंदा प्रेमचंद लुनावत यांना जाहीर झाला आहे. २५ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता श्री वर्धमान स्तानक येथे आयोजित कार्यक्रमात युवा स्वाभिमानच्या अध्यक्ष नवनीत राणा यांच्या हस्ते प्रदान करण्या ...
बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के राजीव जागांसाठी पहिल्या सोडतीत समाविष्ट झालेल्या बालकांना आता येत्या ४ एप्रिलपर्यंत प्रवेश घेता येणार आहे ...
पाकिस्तानातील तब्बल २७० हिंदू शुक्रवारी गुरुकुंजात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपुढे नतमस्तक झाले. ते एक महिन्याच्या व्हिसावर भारत भ्रमण करीत आहेत. ...
शीतल पाटील हत्याकांडातील अटक आरोपी अॅड. सुनील गजभिये शीतलच्या अखेरच्या क्षणापर्यंत सोबत असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. मात्र, शीतलने आत्महत्या केल्याच्या भूमिकेवर तो ठाम असल्याचे पोलिसांना आढळून आले. ...
तालुक्यातील शिरखेड येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २३ मार्च रोजी शिरखेड येथील संतप्त ग्रामस्थांनी मोर्शीचे गटविकास अधिकारी कार्यालय गाठून कक्षात ठिय्या दिला ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांचे थकीत वीज बिल शासनाने ग्रामपंचायतींच्या माथी मारले आहे. ही रक्कम ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भागवावी, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे. ...
आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या जिल्हाभरातील संस्थाचालकांना अद्यापही मागील काही वर्षांपासून शासनाकडून देण्यात येणारा शाळांना प्रतिपूर्ती शुल्काचा निधी मिळालेला नाही. ...