ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
तालुक्यातील रुग्णांसाठी येथे १०० खाटांचे अद्ययावत महिला रुग्णालय साकारणार असल्याची माहिती आ. बच्चू कडू यांनी दिली. राज्य शासनाने या रुग्णालयास मंजुरी दिली असून, लवकरच हे रुग्णालय मूर्तरूपास येणार असल्याचे ते म्हणाले. ...
शहानूर धरणातून होणारा पाणीपुरवठा चार वर्षांपासून अपुरा असल्याने शहरातील सुर्जी, बालाजीनगर, शहापूरा, गणेशनगर, तेलीपुरा, देशमुखपुरा भागात पाणी मिळत नाही. ...
येथील ‘संस्कार भारती’ च्या वतीने पाडवा पहाट अलोट गर्दीच्या साक्षीने रविवारी पार पडला. शंभरावर तरुण कलावंतांनी नृत्य, नाट्य, संगीत, रांगोळी आणि चित्रकला या कलाप्रकारांच्या माध्यमातून दर्जेदार सादरीकरण करून अमरावतीकरांची उत्स्फूर्त दाद घेतली. ...
हल्दीराम कंपनीच्या पाव ‘एक्सपायरी डेट ’आधीच चुरा झाल्याची तक्रार करण्यासाठी एका ग्राहकाने शनिवारी पोलिसांकडे धाव घेतली. संबधित ग्राहक आता अन्न व औषधी प्रशासनाकडे तक्रार करणार आहे. ...
शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या शास्वत उत्पन्नात वाढ व्हावी, या उदात्त भावनेतून शासनाद्वारा पाच दिवसीय कृषी महोत्सवाची प्रत्येक जिल्ह्यात उपलब्धी करण्यात आली. ...
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. भारतीय नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून होतो. उंच काठीवर तांब्याची पालथी लोेटी, भरजरी साडी, गाठी आणि कडुनिंबाच्या डाफळीने सजलेली गुढी दारोदारी उभारून नववर्षांचे स्वागत करण्याची परंपरा आहे. ...