उन्हाळा प्रारंभ होताच चोर पावलाने साथरोगांनी प्रवेश आरंभला आहे. शहरातील एका खासगी रूग्णालयात कॉलराचे दोन रूग्ण ‘पॉझिटिव्ह’ आढळले. महापालिका आरोग्य विभागाने या रूग्णाचे नमुने घेतले असून, ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले आहे. ...
तहसील कार्यालयावर लागलेल्या पोळातील मधमाशांनी २१ मार्च रोजी दुपारी १ वाजता अचानक हल्ला चढविल्याने तलाठी, ग्रामसेवकासह चार जण जखमी झाले. त्यांच्यावर तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
नजीकच्या पोहरा जंगलातून स्थलांतरित नवाब नावाचा वाघ गायब झाल्याप्रकरणी सीआयडीमार्फत चौकशी करून यातील दोषींना जेरबंद करावे आणि यातील सत्यता बाहेर काढावी, अशी मागणी सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर यांनी केली आहे. ...
चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा येथे दहा वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या आमपाटी प्रकल्पात शेतजमिनी गेलेल्या शेतकºयांना मोबदला मिळालाच नाही. त्यामुळे त्यांनी मंगळवारपासून धरणस्थळावर कुटुंबासह बेमुदत उपोषण सुरू केले. ...
सरासरीपेक्षा ३६ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने १४६ निरीक्षण विहिरींच्या नोंदीअंती १३ तालुक्यांत सरासरी १.६४ मीटरने पाण्याची पातळी खालावल्याचा अहवाल दिला आहे. ...
रेल्वे खिडक्यांवर अनारक्षित तिकीट मिळविण्यासाठी लांबलचक रांगेत तासन्तास उभे राहण्याची भानगड आता संपुष्टात आली असून, सामान्य तिकीट आता मोबाईलवर मिळणार आहे. ...
गुरवार, २२ मार्च रोजी दिवस-रात्र एकसमान राहणार असून, या दिवशी दिवस व रात्र १२ तासाचे म्हणजे समान राहणार असल्याची माहिती हौशी खगोलीय अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली. ...