महापालिकेच्या अतिक्रमण विभागात उघड झालेल्या लॉगबूक व इंधनातील अनियमिततेची चौकशी अद्यापही पूर्ण झालेली नाही. याबाबतची नस्ती तूर्तास मुख्य लेखापरीक्षकांकडे परत पाठविण्यात येणार असून, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंतिम चौकशी अहवाल येण्याची शक्यता आहे ...
उन्हाळ्याला प्रारंभ होताच नजीकच्या सुकळी कंपोस्ट डेपोला आग लागण्यास सुरूवात झाली असून, मागील पंधरवड्यात आग लागल्याने आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट होते. ती आग आटोक्यात आली असली तरी अजूनही येथील एका भागात आग धुमसतच आहे. या आगीच्या घटनेला मनपा प्रशासन ...
फळांचा राजा असलेला कोकणातील देवगडचा चविष्ट हापूस आंबा अंबानगरीत दाखल झाला असून, श्याम चौकातील एका खासगी व्यापाऱ्यांनी तो विक्रीसाठी आणला आहे. एक डझनसाठी चक्क १४०० रुपये मोजावे लागत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत: अनुदानित, विनाअनुदान शाळेतील कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना सुरू ठेवण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी शिक्षण संघर्ष संघटनेने जिल्हा कचेरीवर धडक दिली. अध्यक्ष संगीता शिंदे यां ...
जिल्ह्यातील २४ ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात अपघातप्रवण स्थळी अपघात होऊच नयेत, यासाठी तात्पुरत्या व दीर्घकालीन उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. यात तात्पुरत्या उपाययोजनांवर ११ लाख, तर ‘लाँग टर्म’ उपाययोजनांवर २.३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या उपाययोजनांवर ...
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून प्रसिद्ध वरूड तालुक्यातील संत्राउत्पादकांना तीव्र उन्हामुळे फळगळीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय संत्राझाडांना देण्यासाठी पाणी मिळवितानाही प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत. ...
राजापेठ बसस्थानकामागे असलेल्या बजरंग टेकडी भागातील अतिक्रमण शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या नेतृत्वात ही व्यापक कारवाई करण्यात आली. ...
जिल्ह्यात रविवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे चांदूरबाजार तालुक्यातील ६६५ शेतकऱ्यांच्या ६६५ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाले. या विषयीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. ...