भातकुली तालुक्यातील कुंड खुर्द येथे गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत आठ घरे भस्मसात झाली. यामध्ये पाळीव पशूंसह दुकानही जळाले. आ. रवि राणा यांनी आपद्ग्रस्तांची शुक्रवारी भेट घेतली. ...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शनच्या मागणीसाठी जागतिक कामगार दिन, १ मे रोजी मोर्शी तालु्क्यातील ग्रामपंचायत कर्मचारी हे गटविकास अधिकारी कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन करतील. ...
महापालिका आयुक्तांचा सचिव योगेश कोल्हेला एसीबीने पकडल्याने अधिकाऱ्यांच्या दालनात कंत्राटदारांना ‘नो एन्ट्री’ करण्यात आली आहे. कुठल्याही देयकाची फाइल घेऊन कंत्राटदारांना दालनात सोडू नये, अशी सूचना अधिनस्थ यंत्रणेला देण्यात आली आहे. ...
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी यावर्षीच्या मोसमात मंगळवार, २४ एप्रिल रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पात लागलेल्या आगीने गत पाच वर्षांच्या तुलनेत वनक्षेत्राची सर्वाधिक राखरांगोळी केली आहे. ...
यंदा सरासरी इतका पाऊस राहणार असल्याचे भाकित ‘आयएमडी’ द्वारा वर्तविण्यात आले, त्यामुळे खरीप हंगामात सरासरी क्षेत्रापेक्षा अधिक पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत कृषी विभागाद्वारा अमरावती विभागात यंदा ३२ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्ता ...
येथील एका विवाहाच्या स्वागत समारंभाप्रसंगी निमंत्रित सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी नवरदेवाला हेल्मेट भेट दिले. रस्ता सुरक्षा सप्ताहांतर्गंत जागृतीसाठी हा संदेश प्रसंगानिमित्ताने देण्यात आला. ...
वाढत्या उष्णतामानात सर्वत्र तीव्र पाणीटंचाईचे पडसाद उमटत आहेत. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई असताना अमदाबाद छोट्याशा गावात भरपूर जलसाठा असून, सिंचनाच्या दृष्टीने हे गाव खरेच सुजलाम् सुफलाम् असल्याचे चित्र आहे. ...
मेळघाटातील जीवनदायिनी गडगा व सिपना नदीचे पात्र आतापासूनच आटले आहे. आता अनेक ठिकाणी या नदीपात्रात खोदकाम करून मोठमोठे तळे तयार करण्यात येत आहे. या पात्रातून अवैधरीत्या पाण्याचा प्रचंड उपसा करून सिंचनासह वीटभट्टीकरिता वापरण्यात येत आहे. ...
शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाइपलाईन टाकण्यासाठी काँक्रीटचे रस्ते फोडण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराद्वारा ब्रेकींग मशीनचा वापर करण्यात येत आहे. याठिकाणी ट्रॅक्टरवरील जनरेटरच्या मोठ्या आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहे. ...
‘सारे बोलो एकसाथ, दुष्काळाशी दोन हात’ अशा घोषणा देत वरुड तालुक्यातील माणिकपूर व झटांगझिरीच्या ग्रामस्थांनी जल संधारणातून दुष्काळ संपविण्याचा निर्धार केला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी बुधवारी श्रमदान करून गावकऱ्यांचा उत्साह वा ...