स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची आदर्श आचारसंहिता २० एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागासह इतर काही विभागांतून होणाºया कामांना ब्रेक लागला आहे. ...
स्थानिक स्वराज फाऊंडेशन आणि भवानीमाता मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती महोत्सवानिमित्त भवानी आश्रमशाळा प्रांगणात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...
खरीप हंगामात कापूस बियाण्यांची खरेदी करीत असताना शेतकऱ्यांनी सतर्क तसेच बोगस बीटी बियाण्यांपासून सावधान राहण्याचे आवाहन ‘आत्मा’चे प्रकल्प संचालकव तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या किसान कल्याण कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी ...
महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाच्या नाकावर टिच्चून एका कंत्राटदार संस्थेने संगणक परिचालकांची पिळवणूक चालविली आहे. महापालिकेत कंत्राटी तत्त्वावर काम करणारे संगणक परिचालक (डाटा एन्ट्री आॅपरेटर) प्रत्यक्षात आठ तास काम करीत असताना, त्यांना वेतन मात्र ...
मेळघाटातील दिया या गावात सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्पातून यशस्वीरीत्या संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेळघाटातील आणखीन पाच गावांना सौरऊर्जेवरील उपसा सिंचन प्रकल्प योजना राबविण्यास जिल्हाधिकारी यांनी मान्यता देण्यात दिली आहे. या प्रकल्प ...
चांदूर रेल्वे येथे रेल्वे रुळावर बुधवारी बेशुद्धावस्थेत आढळून आलेल्या चार वर्षीय बालक बल्लारशाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरात व्हायरल झालेल्या संदेशामुळे त्या बालकाची ओळख पटली आणि गुरुवारी त्याचे कुटुंबीय अमरावतीत पोहोचले. ...
नागपूर येथील मराठी बोली साहित्य संघाचे सहावे बोली साहित्य संमेलन इचलकरंजी येथे ३० मे रोजी होत आहे. त्याच्या अध्यक्षपदी अमरावती जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक प्रतिमा इंगोले यांची निवड करण्यात आली आहे. ...
खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांचा पारंपरिक पिके घेण्याकडेच अधिक कल असतो. परंतु वैद्यकीय व्यवसायात असलेले हाडाचे शेतकरी आशिष वानखडे यांनी पहिल्यांदाच हळदीची लागवड केली. एका एकरात हळदीने त्यांना पावणेदोन लाखांचा नफा मिळवून दिला. ...
शालेय पोषण आहाराच्या मागील सहा वर्षांतील रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने २० एप्रिलच्या शासनादेशाने मागितला आहे. त्याचा निषेध शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी गुरुवारी येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तांदळाची रिकामी पोती विकून केला ...