शहरासह जिल्ह्यात कमाल तापमान काही दिवसांपासून वाढत आहे. रविवारी दुपारी पारा ४४ अंशावर पोहचला होता. पुढील तीन दिवस त्यात वाढ होऊन ४५ अंशावर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...
२४ बोगीतून प्रवास करीत असलेल्या हजारो प्रवाशांची तंद्री अचानक लागलेल्या एअरब्रेकने भंग केली. बर्थवरून अनेक प्रवासी खाली पडल्याने कुणाला अपघाताचा, तर कुणाला भूकंपाचा संशय होता. ...
बहिणीसोबत मित्राचे प्रेमसंबंध जुळविण्यास मदत केल्याच्या रागातून भावाने अन्य साथीदारांसह एका तरुणाची चाकूने हल्ला करून हत्या केली. योगेश पुंडलिक गाडे (३५,रा. महात्मा फुलेनगर) असे मृताचे नाव आहे. ...
पैसे कमविण्याचा ‘शॉर्टकट’ कोणी कसा शोधून काढेल, याचा नेम नाही. अमरावती-मुंबई एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात ‘सीट’ चोरून प्रवाशांना विकण्याचा फंडा काही महाभागांनी शोधून काढला आहे. यात रेल्वेचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
स्थानिक कठोरा नाका ते नवसारी बायापास तसेच परतवाडा ते अंजनगाव सुर्जी या मार्गातील प्रवासी उन्हाच्या झळांपासून क्षणभर विश्रांतीसाठी झाडांचा गारवा शोधू लागले आहेत. ...
आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी सकाळी ११ वाजता ३ शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित आढळले. हजेरी पुस्तक कोरे आढळल्याने आ. बच्चू कडू यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून त्या कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे स ...
येथील शेतकरी सचिन देशमुख यांना नाशिक येथे ‘डाळिंब मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यातील निवडक २० सत्कारमूर्तींमध्ये त्यांचा समावेश होता. ...
अनधिकृत बांधकाम नियमानुकूल करण्याच्या ‘प्रशमित संरचना अभियानाकडे अनधिकृत बांधकामधारकांनी पाठ फिरविली आहे. सहा महिन्यांपूर्वी आवाहन केल्यानंतही झोनस्तरावर त्यासाठी बोटावर मोजण्याइतपत अर्ज आलेत. ...
दर्यापूर-अमरावती मार्गावरील खोलापूरजवळ शेतात विद्युत पोल लोंबकळले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. सदर विद्युत पोल तेथून हटवावे, अशी मागणी होत आहे. परंतु, याकडे वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करीत आहे. ...