पोलीस ठाण्यावर सशस्त्र हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करणाºया नवनियुक्त डिसीपी निवा जैन यांना केंद्र शासनाने शौर्यपदकाने सन्मामिन केले. त्यांनी जम्मू-काश्मीरच्या कठुआ येथे पोलीस अधीक्षकपदावर असताना ही धाडसी कामगिरी बजावली होती. ...
भूमिगत वीजवाहिनीसाठी खोदण्यात आलेल्या नाल्यांमध्ये पावसाचे पाणी साचून अनेक परिसरात चिखलमय परिस्थिती ओढवली आहे. खड्डे व नाल्यांच्या आजूबाजूला टाकलेली माती रस्त्यावर आल्याने अपघातही वाढले आहेत. ...
तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने महापालिकेच्या खड्डे दुरुस्तीची पोलखोल केली आहे. शहरातील महापालिकेच्या अखत्यारीतील खड्डे जेट पॅचरने बुजविण्यात येतील, हा प्रशासनाचा दावा फोल ठरला आहे. ...
शहरात डेंग्यू व अन्य साथरोगांची लागण झपाट्याने होत असून, उपचारासाठी दाखल रुग्णांनी खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. १७ दिवसांत ५१३ रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणे आढळली आहेत. त्यांचे रक्तजलनमुने शासकीय प्रयोगशाळेत परीक्षणासाठी पाठविले आहेत. ...
महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह कुटुंबीयांच्या आजारपणात उपचार घेण्यासाठी पोलीस विभागांतर्गत नवीन ५४ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची यादी जाहीर झाली आहे. ...
पोलिसांबद्दल फारसे चांगले बोलले जात नाही. मात्र, तेसुद्धा सुहृद आहेत, याचे उदाहरण पोलिसांच्या कृतीतून वेळोवेळी येत असते. शुक्रवारी रस्त्यावर सापडलेल्या दोन हजारांच्या दोन नोटा वाहतूक पोलिसाने कोतवाली ठाण्यात जमा करून प्रामाणिकपणाचे उदाहरण दिले. ...
पावसाने १५ दिवस दडी मारल्याने संत्र्याच्या आंबिया बहाराच्या फळांना बुरशीजन्य अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होऊन गळती लागली आहे. १० ते १५ टक्केच फळे टिकण्याची शक्यता असल्याने संत्राउत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. यंदाही अस्मानी संकट ओढवण्याचे चित्र ...
शहरात सर्वदूर झालेली डेंग्यूची लागण लक्षात घेता आ. रवि राणा शनिवारी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. गरीब जनतेला उपचारासाठी येत असलेला महागडा खर्च पाहता त्यांनी महापालिका यंत्रणेला कामी लावले. यावेळी आ. राणा यांनी काही भागात स्वत: फवारणीसुद्धा केली. ...
प्रशासकीय अप्रामाणिकपणामुळे डेंग्यूच्या मगरमिठीत अमरावतीच्या चार नागरिकांना विसावावे लागले असतानाही जरब बसावी अशी कुठलीही ठोस कारवाई महापालिका आयुक्तांनी अद्याप संबंधितांवर केली नाही. ...