माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधना२मुळे भाजपचा आधारवड हिरावला असून, त्यांची तेज:पुंज प्रतिमा कार्यकर्त्यांच्या मनात ठसठशीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी केले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू मोहन खेडकर यांची आयकर विभागाने चौकशी आरंभली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या लेखा विभागाला ६ आॅगस्ट रोजी पत्र पाठविले. ...
शहरात डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपाबाबत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांसह आरोग्य अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. डेंग्यू नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवा, अशी तंबी त्यांनी दिली. ...
महानगराला डेंग्यूच्या विळख्यातून सावरण्यासाठी आ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने गुरुवारी महापालिकेत आढावा घेण्यात आला. डेंग्यू आजारावर उपचार, प्रतिबंध व उपाययोजनांवर आढावा घेण्यात आला. ...
प्रतिबंध शक्य असतानाही शहरात आश्चर्यकारकरित्या वाढलेल्या डेंग्यूप्रकरणी चौकशीचे आदेश नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी महापालिका प्रशासनाला गुरुवारी दिले. ...
काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी पदभार सांभाळला असून, मुख्यालयी व मलईचे ठाणे न मिळालेल्या काही पोलीस निरीक्षकांना चांगल्या ठाण्यात बदलीचे डोहाळे लागले आहे. ...
डेंग्यूने शहराला घातलेला विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असतानाच वैद्यकीय तांत्रिक त्रुटींमुळेदेखील रुग्ण संभ्रमित होऊ लागले आहेत. एकाच रुग्णाच्या रक्तनमुन्यांचे दोन परस्परविरोधी अहवाल येऊ लागल्यामुळे शहरातील डॉक्टरांवर नाहक संशय व्यक्त होत आहे. ...
डेंग्यूने अमरावती महानगराला मारलेल्या मगरमिठीची नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. याअनुषंगाने ते गुरूवारी अमरावतीत काही निवडक अधिकाऱ्यांची बैठक घेतील. तत्पूर्वी, ते शहरातील काही रुग्णालयांना भेट देतील. ...
तापी नदीच्या भूगर्भातील स्तरांची हालचाल (प्लेट्स मुव्हमेंट) होत असल्याने मेळघाटातील साद्राबाडी या गावात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिली. याशिवाय वेगळी कारणे आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी आयएमडी (इंडियन मेटोरॉ ...