प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेशमूर्तींवर प्रतिबंध लावण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने उपविधी तयार केला असून, त्याला महासभेत मंजुरी मिळाली आहे. उपविधी प्रस्ताव शासनदरबारी मान्यतेसाठी सादर केला जाणार आहे. ...
‘आई, बाबा तुम्ही माझ्यासाठी आयुष्य खर्च केले. मात्र, मी माझ्या मुलाशिवाय राहू शकत नाही. मला माफ करा. पुढच्या जन्मी तुमच्याच पोटी जन्म घेण्याची माझी इच्छा आहे’ अशा आशयाचे तब्बल २५ पानांचे पत्र फेसबूकवर पोस्ट करून युवकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवार ...
राज्याच्या वनविभागाने विविध उपक्रमांच्या नावावर वाटप केलेल्या वनजमिनींच्या १ मार्च १८७९ पासून आजतागायत नोंदी ठेवल्या नाहीत. त्यामुळे महसूल विभागासह अन्य यंत्रणांच्या ताब्यात वनजमिनी असतानासुद्धा त्या परत करण्यास टाळाटाळ केली जात आहे. ...
शिक्षकानेच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी भातकुली ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला. सुरेश ठाकूर असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. शिक्षक दिनीच एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासले. ...
मध्य प्रदेशातील जांब नदीपात्रात भरलेल्या गोटमार यात्रेत पांढुर्णा व सावरगाव येथील नागरिकांत झालेल्या गोटमारीत शंकर भलावी (२५, रा. भुयारी, जि. छिंदवाडा) या तरुणाचा मृत्यू झाला. ...
पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्यक वस्तंूची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेधार्थ काँग्रेसने सोमवारी बंदची हाक दिली. राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, मनसेसह इतर पक्ष व विविध संघटनांनी पाठिंबा दिला. शहरात संमिश्र, ...
दर्यापूर आगारातील बसचालक एका पायाने बस चालवीत असल्याचा धक्कादायक प्रकार 'लोकमत'ने सोमवारच्या अंकातून लोकदरबारात मांडला होता. प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेजबाबदार चालकाच्या कृत्याची गंभीर दखल घेत अमरावती राज्य परिवहन विभागीय प्रमुखांनी कठोर कारव ...
अमर सर्कशीतील प्राण्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशील दखलीनंतर अत्याचारातून मुक्तता झाली. सर्व प्राण्यांना वर्धा येथील पीपल फॉर अॅनिमल यांच्या स्वाधीन करण्यात आले असून, प्राणिप्रेमी संघटनांच्या या लढ्याला यश मिळाले आहे. ...
नोटीस सदस्यांना मिळत नाही. तान्हापोळा सण असताना जिल्हा परिषदेची आमसभा बोलावल्याने अगोदरच सदस्य संप्तत होते. अशातच सभेच्या पटलावर ४१ पैकी नियोजनाचे ८ विषय न ठेवल्याने प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करीत सदस्यांनी गोंधळ घातला. या सर्व प्रकाराला सीईओंसह अन् ...
स्थानिक राजापेठ परिसरातील झेंडा चौकात वास्तव्यास असलेले आणि शिक्षकी पेशात असूनही उभे आयुष्य कविता, साहित्यास समर्पित करणारे तुळशीराम काजे (८६) यांचे रविवारी रात्री पावणेनऊ वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे साहित्यिक आणि कविमनाच्या हृदय ...