स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शनिवारी पालक-शिक्षकांची विशेष सभा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांच्या तक्रारींचा पाढा वाचत पालकांनी गोंधळ घातला. सर्व समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन प्राचार्य अशोकराव इंगळे यांनी पालकांना दि ...
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मालकीची येथील रुख्मिणीनगरात जागा असून त्या जागेवर निवासी ज्ञान स्त्रोत आणि संशोधन केंद्र उभारण्याकरिता सुमारे पाच कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात अडीच कोटी रुपये ...
प्रवाशाने आॅटोत विसरलेला महागडा लॅपटॉप चालकाने बडनेरा पोलीस ठाण्यात जमा करून माणुसकीचा परिचय दिला आहे. या कामगिरीबद्दल ठाणेदार शरद कुलकर्णी यांनी आॅटोचालक शेख समीर शेख गुड्डु (३५,रा.बडनेरा) याला पुष्पगुच्छ देऊन गौरविले. ...
बांबूपासून तयार होणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तू गरजेच्या असून, बांबू हस्तकला व कला केंद्राच्या माध्यमातून तयार होणाऱ्या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारपेठ काबीज करतील, असा विश्वास राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला. ...
महापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी केलेल्या आवाहनास साद देऊन ७० पेक्षा अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे पदोन्नतीचे प्रस्ताव दिले आहेत. त्यासंदर्भात तीन दिवसांपूर्वी निवड समितीची बैठकही पार पडली. मात्र, सेवाज्येष्ठता यादीतील घोळ न ...
विषयसूचीवरून जिल्हा परिषदेच्या आमसभेत शनिवारी पुन्हा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. विरोधी पक्षाचे गटनेता प्रवीण तायडे व काँग्रेसच्या तळेगाव दशासर सर्कलच्या सदस्य अनिता मेश्राम एकमेकांवर धावून गेले. ...
जिल्हा परिषदेची शनिवारी बोलावलेली सभा ही तहकूब सभा होती. विषयसूचीवर नवीन विषय अशा सभेत घेता येत नाहीत. असे असताना प्रवीण तायडे यांनी या मुद्द्यावर सदस्य अनिता मेश्राम यांच्याशी हुज्जत घातली. महिला सदस्यांचा अनादर करणारी त्यांची ही कृती निंदणीय असल्या ...
शहरात डेंग्यूने थैमान घातले आहे. शेकडो रुग्ण पॉझिटिव्ह आहे. अशातच चार जणांच्या मृत्यूस जबाबदार महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी तक्रार राज्य मानवी हक्क आयोगाकडे बडनेरा येथील सिद्धार ...
मुशीर आलम हत्याकांडातील सुनावणीदरम्यान न्यायालयीन प्रतीक्षालयात केक कापून आरोपी उमेश आठवलेचा वाढदिवस साजरा करण्यात आला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची तक्रार फिर्यादी पक्षाने शनिवारी पोलिसांत केली असून, याबद्दल पोलीस उपायुक्त प्रदी ...