शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिद्धपूर येथे रात्री १२ वाजेपर्यंत शिरखेड पोलीस रिद्धपूर येथे गस्तीवर होते. मात्र, तरीही बाजारातील आठ दुकाने व एक घर फोडून चोरांनी अंदाजे ५० हजार रूपये लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री अडीच वाजता घडली. ...
अपुऱ्या पर्जन्यमानामुळे गावागावांतील स्त्रोताची पातळी कमी होत आहे. भुजलाची पातळी देखील खालावल्यामुळे डिसेंबरअखेरपर्यत किमान २७३ गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे. कृती आराखड्याच्या पहिल्या टप्प्यासाठी ३७५ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. ...
रात्री १० नंतर शहरात सुसाट निघणाऱ्या ट्रकची वाहतूक जीवघेणी ठरत आहे. नुकत्याच बडनेरा हद्दीत मद्यधुंद ट्रकचालकांनी घडलविलेल्या दोन गंभीर अपघातावरून हा प्रकार अधोरेखित होतो. अमरावती - बडनेरा मार्ग रात्रीच्या वेळी जीवघेणा ठरत आहे. अशा ट्रकचालकांच्या मनमा ...
सरासरीपेक्षा कमी पावसाने जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली असल्याने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा. उपाययोजनांसह शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रूपये एकराप्रमाणे मदत देण्याची मागणी आ. यशोमती ठाकूर यांनी शासनाकडे सरकारला केल ...
अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीतील ज्येष्ठ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाला पाच वर्षे उलटून गेलेत, सनातनचे कार्यकर्ते अटक केले. मात्र, याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यावर मुख्यमंत्र्यांची चुप्प ...
अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील कोमल प्रकाश गुडघे हिने अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या एका सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेऊन मोस्ट ब्युटीफूल हेअर या प्रकारात सौंदर्यवतीचा बहुमान पटकावला. ...
तालुक्यातील मोर्शी-तिवसा रोडवरील येवती गावाच्या परिसरात नरभक्षी वाघाचे लोकेशन मिळाल्यावरून वनविभाग व मोर्शी तसेच हिवरखेड पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येवती ते पिंपळखुटा (मो.) या रोडवरील देविदासराव राणे यांचे शेताजवळील नाल्यालगत स ...
चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी वन वर्तुळातील वरुडा जंगलातील राखीव वनात वनविभागाने वाघाचे वास्तव्य ओळखण्यासाठी 'प्रेशर इंप्रेशन पॅड'ची उपाययोजना केली आहे. राखीव वनात वाघाचे स्थलांतर झाले की नाही, याची खात्री होण्यासाठी वनक्षेत्रात सात किमीच् ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २० डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ३५ वा दीक्षांत समारंभात ब्रिटिशकालीन संस्कृतीच्या पोषाखाऐवजी आता भारतीय परंपरेचा पोषाख परिधान केला जाणार आहे. विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेने बुधवारी या प्रस्तावाला एकमताने मान्यता प्रदान ...
यावर्षी रबी हंगामात हरभऱ्यासाठी अप्पर वर्धा धरणातून एकपाळी पाणी सोडण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात पाणी सोडण्यात येणार असून, त्याचा लाभ दहा हजार हेक्टर क्षेत्रातील हरभरा उत्पादकांना होणार आहे. ...