आईने किडनीदान करून मातृत्व सिद्ध केले आणि मुलाला जीवनप्रवाहात परत आणले. जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्या पुढाकाराने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किडनी प्रत्यारोपणाची ही शस्त्रक्रिया पार पडली. येथील ही सलग चौथी यशस्वी शस्त्रक्रिया होती. ...
शहरातील सहा अवैध सावकारांवर मंगळवारी सहकार व पणन विभागाच्या पथकाने एकाच वेळा धाडी टाकल्या. उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत शेकडो कोरे धनादेशासह कोट्यवधींच्या व्यवहाराची कागदपत्रे जप्त केलीत. एकाचवेळी सहा सावकारांवर धाड टाकण्याची ही जिल्ह्यातील प ...
शहर पोलीस आयुक्तालयातील गाडगेनगर पोलीस ठाण्याचे प्रमुख असलेले पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे आणि फे्रजरपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख आसाराम चोरमले यांच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र शासनाने पोलीस महासंचालकांना दिले आहेत. ...
सरासरीपेक्षा कमी पाऊस व तीन आठवड्यांचा खंड यामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू झाला. मात्र, दुष्काळाच्या दुसऱ्या ट्रिगरनंतर तालुकास्तरावर १० गावे रँडम पद्धतीने निवडून विहित मापदंडानुसार सत्यापन करावे लागणार आहे. यासाठी क्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शासनाने मूग, सोयाबीन व उडदाची आधारभूत किमतीने खरेदी करण्याचे जाहीर केल्याने स्थानिक शेतकरी येथे खरेदी-विक्री संघामार्फत नाफेडच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी धाव घेतली. सोमवारी नोंदणी होणार असल्याने रविवारी रात्रीपासूनच शेतक ...
तालूक्यातील झाडगाव येथे पांडुरंग बंडूजी राऊत (८५) यांचे वृद्धपकाळाने शनिवारी सायंकाळी निधन झाले. त्यांना पाच विवाहित मुली असून, त्या आपापल्या गांवी राहतात. पण, म्हातारे आइर्-वडील झाडगाव येथेच राहत होते. ...
पूर्व मेळघाट वनविभाग चिखलदरा अंतर्गत अंजनगाव परिक्षेत्रातील चिचखेडा येथे वनविभागाच्या पथकाने रविवारी रात्री टाकलेल्या धाडीत एका घरात सागवान लाकूड जप्त करण्यात आले. वनतस्कराला अटक केली असून, त्याला अचलपूर न्यायालयाने १० आॅक्टोबरपर्यंत वनकोठडी सुनावली ...