संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धा २६ व २७ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमुळे विद्यापीठात नवसंशोधकांची मांदियाळी असणार आहे. ...
वाहतूक पोलिसांनी आतापर्यंतच्या ३६० दिवसांत नियम भंग करणाऱ्या तब्बल ३६ हजार ६५० वाहनचालकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय त्याच्याकडून ८१ लाख ३६ हजारांचा दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेने दिलेल्या आकडेवारीतून अमरावतीकरांना नियमांचे भानच नसल्याचे ...
शहरात नव्याने लागलेल्या एलईडी दिव्यांखालीच अंधार असून, या न लागणाऱ्या दिव्यांसाठी संबंधित कंपनीकडून पाच लाख रुपयांची वसुली करण्याचा ठराव नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी पारित करण्यात आला. ...
यंदा सरासरीपेक्षा २५ टक्के कमी पावसामुळे जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई आहे. या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जून २०१९ अखेरपर्यंत ४६५ गावांत संभाव्य पाणीटंचाई राहणार असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला. जिल्हा परिषदेने याच कालावधीत १०३६ ...
महानुभावपंथीयांची काशी श्रीक्षेत्र रिद्धपूर येथील विकासकामांसाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास अंंतर्गत २१५ कोटी रुपयांचा आराखडा आ. अनिल बोंडे यांनी प्रस्तावित केला आहे. देशभरातून येणारे महंत व भाविकांना या ठिकाणी शेगावच्या धर्तीवर सुविधा उपलब्ध होणार आ ...
परिसरामध्ये आठ दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात धुवारी (दळ) पडले. त्याच्या परिणामी संत्राबागांमध्ये झाडाखाली फळांचा सडा पडला असून, झाडावर आपोआपच संत्राफळे सडत आहेत. याचाच फायदा घेऊन व्यापारी व दलाल संगनमताने मातीमोल भावात बागांचे ...
खारपाणपट्ट््याचा कायापालट करण्यासाठी शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोखरा) अकृषक कामामधून कृषी सहाय्यकांनी अंग काढले आहे. तांत्रिक कामे नकोच यासाठी बंड पुकारल्याने तुर्तास ‘पोखरा’ची कामे रखडली. पर्यायी ...
गोवंशाच्या मांसाच्या विदेशात होणाऱ्या तस्करीचे अमरावती हे मुख्य केंद्र असल्याच्या निष्कर्षाप्रत बडनेरा पोलिसांचा तपास आला आहे. गोवंशाचे तब्बल ११ हजार किलो मांस प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. राज्यात गोवंश मांसविक्रीला बंदी ...
शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने बसविण्यासंदर्भात श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा समितीची सभा महापालिकेच्या सभागृहात सोमवारी पार पडली. वास्तुविशारदांनी यावेळी पुतळ्यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर समितीने शिवटेकडी गाठून स्थळपाहणी केली. ...
राफेल विमान खरेदीत ४१ हजार २०५ कोटींवर दरोडा सत्ताधारी भाजपने घातला. काँग्रेसने यावर वारंवार संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) ची मागणी केली. मात्र, मोदी सरकार ते फेटाळत आहे. आता या घोटाळ्याचा निकाल देशातील जनताच लावेल, असे काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे ...