शहरासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात बोचऱ्या थंडीची लाट पसरली असून, गजबजलेले अमरावती शहर सायंकाळीच सामसूम होत असल्याची स्थिती आहे. पारा गेल्या तीन दिवसांपासून १० अंशाच्या खाली स्थिरावला आहे. ...
शहरात भरदिवसा एका ६० आदिवासी वृद्धेला बळजबरीने दुकानात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याने घटनेचे चित्रीकरण करून समाज माध्यमात व्हायरल केल्याची धक्कादायक घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी उघड झाली. ...
बडनेरा हद्दीतील निंभोरा स्थित मीनाक्षी अपार्टमेंटला चोरट्यांनी लक्ष्य केले. स्टेशन मास्टरचा फ्लॅट फोडून मुद्देमाल लंपास केला. विशेष म्हणजे, चोरांनी अन्य फ्लॅटचे बाहेरून दार लावल्याने नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली होती. सदर कुटुंब बाहेरगावी असल्याने ...
मेळघाटातील कोलकास-सेमाडोह व्हॅलीत बायटींग कोल्डने कहर केला आहे. चिखलदरा व कुकरूत रात्रीचे तापमान 4 डिग्री सेल्सिअसवर आले आहे. चिखलदरा परिसरात दवबिंदू गोठू लागले आहेत. ...
महाराष्ट्र ग्राम दर्पणचे प्रधान सचिव रविराज देशमुख व त्यांच्या चमूच्या उल्लेखनीय कार्याची नोंद फार्मर किसान फोरम व नाशिक येथील आमची माती-आमची माणसं या संस्थेने घेतली आहे. ...
भरधाव वाहनाची जोरदार धडक बसल्यानंतरही जखमींना वाचविण्यासाठी चालकाने आपले चुराडा झालेले वाहन इर्विन रुग्णालयापर्यंत पोहचविले. शुक्रवारी पहाटे ४ वाजता नवसारीजवळील राजपूत धाब्याजवळ घडलेल्या या अपघातात एक जण ठार, तर एक गंभीर जखमी झाला आहे. ...
तेल्हारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना १९ डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यासाठी येथील झेडपी व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी २० डिसेंबरला कामबंद आंदोलन केले होते. ...
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पाहणी दौऱ्यासाठी आले असता, आ. रवि राणा यांनी त्यांची भेट घेऊन रेल्वेशी संबंधित विविध कामांवर चर्चा केली. ...
धावत्या रेल्वे गाडीच्या चालकास व सहायकास त्यांच्या कुटुंबांचा अति महत्त्वाचा संदेश तत्काळ मिळावा, असा आदेश मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी.के. शर्मा यांनी शुक्रवारी (२८ डिसेंबर) बडने-यातील पाहणी दौ-यात दिला. ...
राज्याने दोन हजार मेगावॅटचा ‘सौरऊर्जा प्रकल्प’ हाती घेतला आहे. हा प्रकल्प उभारण्याकरिता प्रत्येक गावाने जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी तालुक्याच्या पातळीवर थेट सरपंचांशी संवाद साधून सौर कृषी वाहिनीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश ...