जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने चालू आर्थिक वर्षात जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या ग्रामीण रस्ते व इतर जिल्हा मार्गाच्या कामासाठी ४५ कोटींचे नियोजन केले. त्यानुसार कामे मार्गी लावण्यासाठी बांधकाम विभागाची धावपळ सुरू आहे. ...
डिप्टी ग्राऊंडमधील दगडफेक व तलवारी उगारण्याच्या घटनेची शाई वाळते न वाळते तोच बुधवारी रात्री १२ नंतर नूरानी चौकात दोन गटांत सशस्त्र चकमक उडाली. प्रचंड दगडफेक करण्यात आली. या चकमकीत एक जण गंभीर जखमी झाला. ...
चाराटंचाईवर मात करण्यासाठी अभिनव प्रयोग धामणगावात यशस्वी ठरला असून, ५० ग्रॅम गहू आणि ५० ग्रॅम मका बियाण्यापासून दोन किलो हिरवा चारा निर्माण करण्याची किमया धामणगाव येथील एका प्राध्यापकाने साधली आहे. ...
वडाळी व चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रातील आटलेल्या जलस्रोतांमुळे वन्यप्राण्यांना पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या अपघाताचे प्रमाण अमरावती-चांदूर रेल्वे मार्गावर वाढले आहेत. ...
राज्यात प्रवासी वाहतूक सेवा देणारे एसटी महामंडळ उत्पन्नवाढीसाठी लवकरच मालवाहू सेवाही पुरविणार आहे. यासाठी जुन्या एसटी बसचा वापर केला जाणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या सूत्रांनी दिली. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. ...