देशात उच्चशिक्षणामध्ये झालेली वाढ कौतुकास्पद आहे. आज आणि उद्याच्या समाजनिर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असून, त्याअनुषंगाने शिक्षणाची पायाभरणी करावी, असे आवाहन शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले. ...
यंदाच्या खरिपात शेतक-यांना कर्जवाटपात बँकांनी असहकार्य केल्यानंतर रबीतही हाच प्रकार सुरू ठेवला आहे. रबी हंगामाच्या १०० दिवसांत विभागातील बँकांनी फक्त चार टक्केच कर्जवाटप केले. ...
संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने १८ कोटी ४७ लाखांचा गाडगेबाबा समाधी मंदिर विकास आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली. ...
अवैध लाकूड वाहून नेणाºया तीन ट्रकला वनविभागाच्या फिरत्या पथकाने १९ डिसेंबर रोजी बडनेऱ्याच्या बस स्थानकासमोरून जाणाºया महामार्गावर पकडले. हा लाकूडफाटा जप्त करण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतिप्रक्रिया लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी होईल, असे संकेत १३ डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील चर्चेच्या वेळी मिळाले. लेखी परीक्षेसाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहेत. राज्यात सर्व जिल्हा ...
शिवटेकडीवर विशिष्ट समुदाय व महापालिका कर्मचारी यांच्यात राडा झाल्यानंतर तणावाची स्थिती निर्माण झाल्याने बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास प्रचंड खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांचा ताफा पोहोचल्यानंतर गर्दी पांगवताना पळापळ अन् एकच गोंधळ उडाला. यादरम्यान ...
स्थानिक कठोरा मार्गावरील रंगोली लॉनमागे संत गाडगेबाबा मंदिराजवळील देशी दारूचे दुकान तातडीने बंद करण्याची मागणी नगरसेविका सुचिता बिरे यांच्या नेतृत्वात महिला व नागरिकांनी बुधवारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. ...
आई-वडील धार्मिक दीक्षा देण्यासाठी बळजबरी करीत असल्यामुळे मी स्वमर्जीने घरातून निघून गेल्याचा गौप्यस्फोट एका २० वर्षीय तरुणीने पोलिसांसमोर केला. दोन वर्षांपासून बेपत्ता असणाऱ्या मुलीचा शिरखेड पोलिसांनी शोध घेतला असता, हा प्रकार उघड झाला. ...
पाच वर्षांपर्यंत वाघांची शिकार करून अवयवांची तस्करी होत असताना आता मांडूळ सापांची तस्करी करणारी टोळीही सक्रिय झाली आहे. देशभरात एका वर्षात २७ साप तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...