परिसरातील सालोड, शिवरा, लोहगाव, तिघरा, मंगरूळ चव्हाळा, पिंपळगाव निपाणी आणि वाढोणा आदी गावात संत्रा आणि गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात गाटपीट झाल्याने नुकसान झाले आहे. शुक्रवारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन तहसीलदार मनोज लोणारकर यांनी पाहणी केली. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या ग्रामीण भागातील धोकादायक इमारत आणि वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच दुरूस्तीचा मुद्दा शुक्रवारी स्थायी समितीत सदस्यांनी आक्रमक होत रेटून धरला. मात्र, त्याकरिता २५ कोटींचा निधी तातडीने जिल्हा नियोजन समितीने ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी ३३.१७ टक्केच पाणीसाठा राहिल्याने सिंचनासह, पिण्यासाठीसुद्धा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
गत दोन वर्षांपासून पथ्रोट परिसरात कमी पाऊस झाल्यामुळे परिसरातील शहानूर व छोटे-मोठे धरण पूर्ण भरले नसल्याने परिसरातील बोअर आटल्या. विहिरीचे खोदकाम करुनही पाणी लागत नाही. त्या कारणाने पाण्याअभावी पथ्रोट परिसरातील संत्राबागा शेतकऱ्यांच्या नजरेसमोर सुकत ...
पुनर्वसनाने आम्हाला दिले काय? दोन टाइमच्या जेवणाची सोय नाही, शेतीची मागणी केली, मुंबईला बैठका झाल्यात, त्या वांझोटा ठरल्या. देतो म्हणतात, पण प्रत्यक्ष काही देत नाही, अशी व्यथा आदिवासी महिलांनी बुधवारी मांडली. ...
परिसरातील श्रीक्षेत्र कोंडेश्वर मार्गावर वीटभट्ट्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने उन्हाळ्याची चाहूल लागताच उष्णतेचे परिणाम जाणवू लागले आहे. त्यामुळे येत्या शिवरात्रीच्या पर्वावर या मार्गाने हजारो भाविक ये-जा करतात. मात्र, या वीटभट्टयांची उष्णता आतापा ...
भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेनंतर दुचाकीवरील महिला तिच्या चार वर्षीय चिमुकल्यासह पुलावरून वर्धा नदीच्या पात्रात फेकली गेल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास कौंडण्यपूर येथे घडली. त्या महिलेस नदीपात्राबाहेर काढण्यात आले. ...
माधुरी पोजगे खूनप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली व नंतर त्यांची जामिनावर सुटकासुद्धा झाली. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून मृताचा डीएनए अहवाल का प्राप्त झाला नाही ...
केलपाणी जंगलात मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास पोलीस, सीआरपीएफ, वनाधिकारी-कर्मचारी यांच्यावर हल्ला करणा-या ११० आदिवासींविरुद्ध सहायक पोलीस उपनिरीक्षक दिनेश तायडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत. ...