मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसंदर्भात महाविद्यालये आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. परिणामी अमरावती विभागात १ लाख ९२ हजार ८१८ प्राप्त अर्जांपैकी १ लाख ६० हजार ३४१ शिष्यवृत्तीचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. ...
तिवसा तालुक्याची तृष्णातृप्ती भागविणाऱ्या माळेगाव धरणाला जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला कोरड पडली आहे. हे धरण आटण्याची घटिका समीप आल्याने त्यातील जलजीवसृष्टीचा नाश झाला आहे. त्यामुळे नजीकच्या गावांवर येत्या उन्हाळ्यात जलसंकट निर्माण होण्याचे दुश्चिन ...
तिवस्याचे माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीला आ. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून इर्विन रुग्णालयातील बालरुग्ण कक्षात पुष्पमाला ठाकूर यांच्या हस्ते रविवारी २३ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. ...
खरिपाची अंतिम पैसेवारीत धारणी व्यतिरिक्त सर्वच तालुक्यांना न्याय देण्यात आला. मात्र, जाहीर १८०७ गावांपैकी १०७६ गावे ही यापूर्वीच दुष्काळ जाहीर केलेले तालुके व मंडळातील आहेत. याव्यतिरिक्त ७३१ गावांतदेखील खरिपाची दुष्काळस्थिती असल्याचे चित्र या पैसेवार ...
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : वाहतूक नियमांचे पालन करण्याविषयी ट्रॅफिक सेन्स उपक्रमात विद्यार्थ्यांना देण्यात आलेली माहिती सजगता निर्माण करणारी ... ...
किचकट व अवजड कामे करीत असलेल्या मेळघाटातील १० अल्पवयीन मजुरांना अहमदाबाद येथून परत आणण्यात ‘की पर्सन’ ठरलेल्या २२ वर्षीय युवकाचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे उघड झाले. तो १ जानेवारीपासून बेपत्ता होता. त्याच्या मृत्यूने बोथरा गावात शोककळा पसरली आहे. ...
अचलपूर जिल्ह्याच्या मागणीला ३८ वर्षे पूर्ण झालीत. १९८० पासून आजही ही मागणी प्रलंबित आहे. तथापि, चांदूरबाजार तालुक्याचे विभाजन करून आसेगाव पूर्णा आणि चिखलदरा तालुक्याचे विभाजन करून चुरणी तालुका झाल्याशिवाय अचलपूर जिल्हा होणे नाही. ...
येथील सांस्कृतिक भवनानजीकच्या महापालिकेचे व्यापारी संकुलास मद्यशौकिनांनी दारूचा अड्डा बनविला आहे. रोज रात्री संकुलातील दुकाने बंद झाल्यानंतर यथेच्छ दारू ढोसली जात असल्याचे वास्तव आहे. या ठिकाणी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बॉटल्स, डिस्पोजेबल ग्लास याची ...