लक्षवेधक ठरलेल्या या बैलबाजारात ३५ ते ४० हजारांपासून बैलजोड्या तसेच लाख-दीड लाखांचा बैल उपलब्ध आहे. परतवाडा-अमरावती रोडवर अचलपूर नाक्यालगत खुल्या शेतात आठ ते दहा दिवसांपासून बैल विक्रीस उपलब्ध आहेत. ...
‘ब्लॅक विंग स्टिल्ट’ म्हणजेच शेकाट्या या देशांतर्गत पक्ष्यांशी साम्य असणारा ऑस्ट्रेलियन शेकाट्या या नवीन प्रजातीची राज्यात प्रथम नोंद अमरावतीच्या वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक निनाद अभंग यांनी घेतली आहे. ...
धूलिवंदनाला शहरात टवाळखोरांचा हैदोस पाहायला मिळाला. बडनेरा ते लोणी मार्गावरून लिफ्ट घेणाऱ्या दोन महिलांनी भरधाव वाहनातून उडी घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. याशिवाय विनयभंगाचे तीन, तर मारहाणीचा एक असे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. ...
तालुक्यातील शेंदोळा बुजरूक हे गाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतले आहे. मार्च महिन्यातच भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने गावातील सर्व विहिरी, बोर व तलाव आटल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू ...
वलगाव मार्गालगतच्या रॉयल पॅलेसजवळील परिसरात वसलेल्या तब्बल दहा झोपड्या शुक्रवारी दुपारी आगीच्या भक्षस्थानी सापडल्या. अग्निशमन दलाच्या अथक परिश्रमानंतर दोन तासांनी आग आटोक्यात आली. या आगीमुळे कामगारांची दहा कुटुंबीये उघड्यावर आली आहेत. ...
दप्तरदिरंगाई आणि लोकप्रतिनिधींच्या फुक्या आश्वासनात अडकलेल्या स्थानिक स्मशानभूमीची गुरुवारी धूळवडीच्या दिवशी संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. या स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गतवर्षी एका मृतदेहावर बसस्थानकानजीक उघड्यावर अंत्यसंस्कार करावा लागला ...
देशपातळीवरील राजकारणात अमरावती जिल्ह्यातील स्त्रीशक्तीची छाप राहिली आहे. या लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत तीन महिला खासदाराची कारकीर्द बहारदार अन् कामगिरी दमदार राहिली आहे. ...