एक १७ वर्षीय तरुण चाकुचा धाक दाखवून नागरिकांची लुटमार करीत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार चटकन खुर्चीवरून उठले आणि माहिती देणाºयालाच दुचाकीवर घेऊन घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पाहून चाकू दाखविणाºया तरुणाचे अवसान गळाले आणि तो सैरावैरा पळत सुटला. ...
यंदाच्या आर्थिक वर्षात महापालिकेचा मालमत्ता कराची ४३.२३ कोटींची मागणी असतांना किमान दहा टक्के थकबाकी ही शासकीय कार्यालये व संस्थाकडे आहे. त्यामुळे महापालिकेने थकबाकीदारांना आता जप्तीनामा नोटीस बजावणे सुरू केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासह, प ...
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या प्रवेशबंदीच्या आदेशानंतरही भातकुली तालुक्यातील गावांमध्ये झालेली परप्रांतीय मेंढपाळांच्या घुसखोरीला ब्रेक लागलेला नाही. त्यामुळे महसूल विभाग आदेश काढून मोकळा झाला. मात्र, ज्यांच्यावर कारवाईची धुरा सोपविली, ती चार ते पाच ठाण्य ...
मेळघाटसाठी जीवनदायिनी ठरणारी गडगा आणि सिपना नदी सध्या शेवटच्या घटका मोजत आहे. वर्षभर पात्रात पाणी बाळगणाऱ्या या नदीतून मोठ्या प्रमाणात मोटर पंपद्वारे उपसा करण्यात येत असल्यामुळे ती फेब्रुवारी महिन्यापूर्वीच आटली आहे. ...
राज्यातील वनविभागाच्या अखत्यारितील जंगलात १६ फेब्रुवारीपासून आगीच्या घटनांना सुरुवात झाली आहे. उपाययोजना म्हणून जंगलातील जाळरेषा जाळण्याचे काम १५ फेब्रुवारी रोजी संपले असून, आता संपूर्ण राज्यात आगीपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी वनाधिकारी ते क्षेत् ...
तालुक्याला शुक्रवारी दुपारी अवकाळी पावसाचा फटका बसला. सुमारे २० मिनिटे बोराएवढी गारपीट झाल्याने संत्रा, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील कारली, वाई, पेंढोणी, जामगाव, महेंद्री, करवार, पंढरी, पुसला परिसरात अवकाळी पावसासह ही गारपीट झाली. ...
लगतच्या पेढी गावातील क्वार्टर भागातील रहिवासी श्यामराव हरिश्चंद्र सोळंके यांच्या घराला शुक्रवारी दुपारी आग लागली. या आगीत त्यांचे झोपडीवजा घर जळून खाक झाले. ग्रामस्थांनी वेळेवर धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कुडामातीचे घर स्वाहा झाले. शुक् ...
महाजनपुरा,माताखिडकी परिसरातील तरुणांमध्ये झालेल्या पूर्वीच्या वादातील खुन्नस योगेशच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. दोन तरुणांच्या गटातील तिरस्काराची भावना नेहमीच वादातीत राहिल्यामुळे या तरुणांच्या वर्चस्वाच्या लढाईत योगेशचा बळी गेल्याची प्रतिक्रिया उमटली ...
शिवसेना नगरसेविकेच्या पतिराजाने सोमवारी केलेल्या प्रतापानंतर महिला सदस्यांचे पती व कुटुंबीयांद्वारे महापालिका कामकाजात होत असलेला हस्तक्षेप चव्हाट्यावर आला. प्रशासनात किमान डझनभर पतिराजांची ढवळाढवळ होत असल्याची माहिती आता बाहेर आलेली आहे. ज्या मतदारा ...