मध्यप्रदेशातून वाहनात कोंबून अमरावतीत कत्तलीसाठी आणल्या गेलेले ५२ गोवंश स्थानिक लालखडीच्या अकबरनगर गोदामातून गुरूवारी सकाळी ११ वाजता दरम्यान ताब्यात घेण्यात आली. ...
देशांतर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेश या तीन राज्यांतील प्रत्येकी एका शहराची यशोगाथा या संकेतस्थळावर आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती महापालिकेचा बहुमान या यशोगाथेच्या माध्यमातून करण्यात आला आहे. ...
शहरात वाहनांच्या वर्दळीत काय घडेल, याचा नेमच राहिला नाही. टँकरमधील गरम डांबराचे शितोंडे उडल्याने एक मोपेड चालक गंभीररीत्या भाजला गेला, तर तिघांचे काळ्या डागांवरच निभावले. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी ७.४० वाजताच्या सुमारास राजापेठच्या नवीन उड् ...
तेलाचा वारंवार पुनर्वापर हा आता नियमानुसार नियमबाह्य ठरतो. त्यानुसार भारतीय फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटीच्या सूचनेवरून शासनाने त्यावर १ मार्चपासून निर्बंधही आणला आहे. हॉटेलमध्ये तेलाचे पुनर्वापर झाले किंवा नाही, त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी व त्यावर प ...
तालुक्यातील उसळगव्हाण येथे गावगुंडाने ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असलेल्या ग्रामसेवकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी आरोपीला अटक होईपर्यंत शासकीय कामकाज न करण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेने दिला आहे ...
जिल्ह्यासाठी जीवनदायिनी ठरलेले अप्पर वर्धा धरण गाळात रुतून बसले आहे. या धरणातील उपयुक्त जलसाठा २२ टक्क्यांपर्यंत खाली आल्याने भर उन्हाळ्यात हे धरण कोरडे पडण्याची दुश्चिन्हे आहेत. ...
पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांसाठी राबविला जाणाऱ्या कृषिसमृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्पाने (केम) २० दिवसांत ३२.४० कोटी रुपये निधी खर्च केला आहे. शासनाकडून निधी प्राप्त होण्यापूर्वीच निविदा प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे सह ...
येथील मॉडेल रेल्वे स्थानकावर वाणिज्य विभागाकडून विशेष मोहिमेंतर्गत बुधवारी सकाळी ८ वाजता १७ विनातिकीट प्रवाशांकडून ६५०० रूपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम निरंतरपणे सुरू असणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वे मालमत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेस ...
मध्य झोन क्रमांक २ राजापेठमधील वॉर्ड क्रमांक २२ मध्ये असलेल्या एका मोबाईल कंपनीचे टॉवर महापालिकेच्या राजापेठ मध्य झोन क्रमांक २ चे सहायक आयुक्तांनी सील केले. ही कारवाई बुधवारी जप्ती पथकाने केली. सदर मोबाईल टॉवर कंपनीवर अडीच लाखांची थकबाकी असल्याची बा ...