ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
शहरातील ख्रिश्चन मिशनरीच्या वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्याला तेथील कर्मचाऱ्याने गुरुवारी रात्री १० च्या सुमारास बेदम मारहाण केली. त्या मारहाणीचे वळ विद्यार्थ्याच्या शरीरभर उमटले आहेत. विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या कर्मचाºयास धारणी पोलि ...
हिवर वृक्षाच्या शेंगा खाल्ल्याने दहा बकऱ्या दगावल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास भानखेडा रोडवर घडली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. ...
नजीकच्या डिगरगव्हाण येथे आयोजित दामोदर महाराज यात्रेत शुक्रवारी सायंकाळी दोन गटांत वाद झाला. यामध्ये एका तरुणाची हत्या करण्यात आली, तर तिघे जखमी झाले. समीर गणेश कांबळे (२०, रा. पिंपळझिरा) असे मृताचे नाव आहे. माहुली जहागीर पोलिसांनी विशिष्ट समुदायातील ...
येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाची दुरवस्था पाहता, हे आरोग्य यंत्रणेचे कार्यालय की भंगारखाना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘अ’ श्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्याची पदस्थापना असलेल्या कार्यालयाच्या आतील भागात मोठ्या प्रमाणात भंगार साठवून ठेवण्यात आले आहे. ...
जरूडमध्ये पडलेल्या दरोड्याची शाई वाळते न वाळतेच शुक्रवारी नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी महेश कॉलनीमध्ये चोरी घडली होती. आठवडाभरात चार चोऱ्या झाल्याने व्यावसायिकांसह नागरिकांमध्ये भीतिद ...
देशात भाजपमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे हवा बघून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या दोन्ही कॅप्टननी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली. ...
जेमतेम दोन दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र, आता शरद पवार यांना भाजपात घेऊ नका, असा सल्ला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना शुक्रवारी येथे दिला. ...
शिवसेना-भाजप युती अभेद्य आहे, काही जण शिवसेना-भाजप भांडावेत यासाठी देव पाण्यात घालून बसले होते, ही निवडणुकीपूरती नाही. सत्तेसाठी नाही. ही विचारांची युती आहे. म्हणूनच ती टिकली आणि भविष्यातही टिकणार आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल ...
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे वितरण लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे थांबले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना आणखी दीड ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...
केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार देशभरात आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणांना निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. ...