ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
नाफेडद्वारे सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रात तालुक्यातील ३,५७८ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्यापैकी दहा दिवसांत १०७ शेतकऱ्यांची १,४८३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. त्यानंतर सोमवारपर्यंत दोन शेतकऱ्यांना तूर खरेदीसाठी संदेश पाठवविले. ३,३०० शेतकरी ...
अंजनगाव बारी परिसरातील पाण्याचे प्रमुख स्रोत कोंडेश्वर तलाव, गंभीवीर तलाव तसेच कोंडेश्वर येथील विहीर कोरडी झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, भिवापूर तलावात विहीर खोदून त्यावर पाईपलाईन टाकण्यात आली आहे. ...
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी दाभा गावातील एका खासगी शेतात स्ट्रॉबेरीची शेती फुलविली आहे. आयआयटी दिल्लीची चमू या प्रकल्पाची पाहणी करणार आहे. ...
रंगासोबतच मधग्रंथीचे वरदान लाभलेल्या पळस वृक्षाला जैवविविधतेत अनन्य साधारण महत्त्व आहे. कोठेही सहज उपलब्ध होणाऱ्या पळस वृक्षाची मुळापासून तर फुलापर्यंतच्या भागाला आयुर्वेदात महत्त्व आहे. पळस वृक्षांमुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून आहे. ...
'तारे जमी पे' या चित्रपटात दाखविलेल्या मुलाप्रमाणे अमरावतीतही 'लर्निंग डिसऑर्डर' आजाराचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षक मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे. त्यामुळे शिक्षक व पालकांनी मुलांकडे दुर्लक्ष न करता, त्यांना योग्य मार्गदर्शन करून उपचार करायला हवा. ...
येथील पावणेदोन वर्षे वयाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टाक्यात पडून मृत्यू झाला. १६ मार्च रोजी सायंकाळी घडली. वंश शाम रोतळे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. त्याच्या चिमुकल्या कलेवरावर रविवारी अंतिमसंस्कार करण्यात आले. येथील रोतळे कुटुंब पंचक्रोशीत मूर्तिका ...
शहराच्या पश्चिमेकडील लालखडी परिसरातील अकबरनगर वॉटर सप्लाय येथे एका अवैध कत्तलखान्यात बाहेरून कुलूप अन् आत गोवंशाची कत्तल, असा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याची धक्कादायक माहिती आहे. या नव्या शक्कलीमुळे पोलीस यंत्रणेला गुंगारा देण्याचा अफलातून प्रकार अवै ...
कुख्यात गुन्हेगार अशोक उत्तम सरदार (३४, रा.जेवडनगर) याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. त्याला एक वर्षासाठी तुरुगांत स्थानबद्ध केले आहे. ...