लोकसभा मतदारसंघाची मतगणना गुरूवारी सकाळी ८ वाजता नेमाणी गोडाऊनमध्ये सुरू होईल. मतमोजणीच्या एकूण १८ फेऱ्या होतील. पहिल्या फेरीचे मतदान ४० मिनिटांत जाहीर होण्याची शक्यता असल्याने निकालाचा ट्रेंड स्पष्ट होणार आहे. रात्री उशिरा जाहीर होणारा निकाल येत्या ...
आतापर्यंत राज्यात २७ हजार गावांमध्ये जैवविविधता व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या समित्या स्थापन करण्यात महापालिका, जिल्हा परिषद माघारल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने घेतला आहे. ...
तप्त उन्हात वणवण भटकंती करणाऱ्या एका अनोळखी इसमाचा उष्माघाताने मृत्यू झाला. ४५ ते ५० वयोगटातील त्या अनोळखीचा मृतदेह मंगळवारी सकाळी शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील एका झाडासाठी केलेल्या आळ्यात आढळून आला. ...
मतदानकार्य पार पाडल्यानंतर अमरावती लोकसभेतील मतदारांना असलेली मतमोजणीची प्रतीक्षा आता उत्सुकतेच्या शिखरावर पोहोचली आहे. आता मतमोजणी आरंभ होण्यासाठी मतदारांना २४ तास धीर धरावा लागणार आहे. ...
सन २०१३ नंतर सहा वर्षांनी पुन्हा एकदा भुलोरी गावाने अग्निप्रलय अनुभवला. सहा वर्षांपूर्वीचे कटू अनुभव बाजूला सारत आदिवासी बांधवांनी नवा आशियाना उभारला. मात्र, आज पुन्हा तो आशियाना आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. कदाचित धारणी मुख्यालयी अग्निशमन यंत्रणा असती ...
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी २३ मे रोजी नेमाणी गोडाऊनमध्ये सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाचा या ठिकाणी ठिय्या आहे. मंगळवारी न्यू सुविधा पोर्टलसाठी ‘डायरन’ घेण्यात आले, तर मतमोजणी प्रक्रियेमधील सर्व अधिकारी व क ...
विनापरवाना औषधसाठा गोळा करून ठेवणाऱ्या वरूड येथील भवानी मेडिकल अँड सर्र्जिकल्सचे संचालक सांरग नारायण चौधरी यांच्या घरावर सोमवारी अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकली. त्यांच्या घरातून तब्बल २ लाख ४४ हजार १४५ रुपयांचा अॅलोपॅथिक औषधसाठा एफडीएने जप्त ...
तालुक्यातील सोमवारखेडा येथून चिखलदरा स्थित देवी पॉइंटवर नवसाचे जेवण करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांनी करकचून भरलेले प्रवासी वाहन उलटून झालेल्या अपघातात २२ जण जखमी झाले. भरधाव प्रवासी वाहनाला बदनापूर येथील वळणावर मंगळवारी सकाळी ७:५५ वाजता हा अपघात झाला ...
अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यातील ८३ गावांना सपन प्रकल्पातून वर्षाला ६.९१७ दलघमी पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे ते नियोजन बारगळले. परिणामी ८३ गावांतील ग्रामस्थांना पडलेले मुबलक पाणीपुरवठ्याचे स्वप्न पूर्णत ...